शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

फाईल बाहेर जाऊ नयेत...! दिल्ली सचिवालय सील; आपचा पराभव निश्चित होताच उपराज्यपालांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 17:04 IST

गेल्या १० वर्षांपासून दिल्लीवर आपची एकहाती सत्ता होती. यामुळे आप कोणालाच जुमानत नव्हती. या काळात कोणते कोणते निर्णय घेतले, काय काय उद्योग केले याच्या फाईल बाहेर जाऊ नयेत म्हणून उपराज्यपालांनी दिल्ली सचिवालय सील करण्याचे आदेश दिले आहेत. 

गेल्या दीड वर्षांपासून आपला भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्द्यावरून चोहोबाजुंनी घेरल्यानंतर भाजपाने अखेर दिल्लीवर २७ वर्षांनी भगवा झेंडा फडकविला आहे. गेल्या १० वर्षांपासून दिल्लीवर आपची एकहाती सत्ता होती. यामुळे आप कोणालाच जुमानत नव्हती. या काळात कोणते कोणते निर्णय घेतले, काय काय उद्योग केले याच्या फाईल बाहेर जाऊ नयेत म्हणून उपराज्यपालांनी दिल्ली सचिवालय सील करण्याचे आदेश दिले आहेत. 

आप हरल्याचे स्पष्ट होताच उपराज्यपालांनी सचिवालय सील करण्याचे आदेश देत दिल्ली सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाचारण केले आहे. व्ही के सक्सेना यांच्या निर्देशानंतर दिल्लीच्या सामान्य प्रशासन विभागाने याचा आदेश काढला आहे. 

भाजपाच्या ३० जागा जिंकल्याचे समजताच सक्सेना यांनी या हाचलाची केल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाने आपल्या आदेशात सचिवालयातील कागदपत्रांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. विभागाच्या परवानगीशिवाय कोणतीही फाइल, कागदपत्रे, संगणक हार्डवेअर इत्यादी दिल्ली सचिवालयाच्या बाहेर नेले जाऊ शकत नाही. तसेच, सर्व विभाग, एजन्सी आणि मंत्री परिषदेच्या कॅम्प ऑफिसना विभागाच्या परवानगीशिवाय कोणतेही रेकॉर्ड किंवा फाइल्स हटवू नयेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

केजरीवालांकडून भाजपाला शुभेच्छा...आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. त्यात त्यांनी भाजपाला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, मी भाजपाला विजयाच्या शुभेच्छा देतो. मी अशी अपेक्षा करतो की दिल्लीच्या जनतेने भाजपाला ज्या गोष्टींसाठी मतं दिली आहेत, ती विधायक कामे भविष्यात भाजपाकडून नीट पार पाडली जातील. गेल्या १० वर्षात आमच्या पक्षाने प्रत्येक क्षेत्रात कार्यरत राहून दिल्लीचा विकास केला. दिल्लीकरांना सर्व सोयीसुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहिला. दिल्लीतील पायाभूत सुविधा सुधारण्यावरही आम्ही काम केले. आता आम्ही विरोधीपक्षाची भूमिकाही चोख पार पाडू. दिल्लीकरांच्या सुख-दु:खात आम्ही नक्कीच त्यांच्या सोबत असू. आम्ही राजकारणात सेवा करण्यासाठीच आलो आहोत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी घेतलेल्या कष्टासाठी त्यांचे आभार, अशा भावना केजरीवाल यांनी व्यक्त केल्या

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाAAPआप