पळवून नेणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

By Admin | Updated: August 11, 2015 23:16 IST2015-08-11T23:16:07+5:302015-08-11T23:16:07+5:30

नागपूर : यशोधरानगर हद्दीत वनदेवीनगर चौकातील रहिवासी उस्तकला क्रिष्णा डेहलवार (वय ४८) यांचा १६ वर्षीय मुलगा विकास आणि त्याचा मित्र हर्ष गठ्ठलवार (वय १२) हे दोघे रविवारी दुपारपासून बेपत्ता आहेत. खेळायला जातो, असे सांगून विकास आणि हर्ष घराबाहेर गेले होते. ते परतलेच नाही. त्यांना फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय आहे. डेहलवार यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. बेपत्ता मुलांचा शोध घेतला जात आहे.

Filed a complaint against the arrested accused | पळवून नेणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पळवून नेणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

गपूर : यशोधरानगर हद्दीत वनदेवीनगर चौकातील रहिवासी उस्तकला क्रिष्णा डेहलवार (वय ४८) यांचा १६ वर्षीय मुलगा विकास आणि त्याचा मित्र हर्ष गठ्ठलवार (वय १२) हे दोघे रविवारी दुपारपासून बेपत्ता आहेत. खेळायला जातो, असे सांगून विकास आणि हर्ष घराबाहेर गेले होते. ते परतलेच नाही. त्यांना फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय आहे. डेहलवार यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. बेपत्ता मुलांचा शोध घेतला जात आहे.
वसतिगृहातील बालिका बेपत्ता
सदरमधील शासकीय वसतिगृहातील नऊ वर्षीय बालिका सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास बेपत्ता झाली. वसतिगृहाच्या अधीक्षिकांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तिचा शोध घेतला जात आहे.
---

Web Title: Filed a complaint against the arrested accused