शाहरूख खानविरोधात गुन्हा दाखल

By Admin | Updated: February 15, 2017 07:15 IST2017-02-15T06:00:09+5:302017-02-15T07:15:12+5:30

अभिनेता शाहरुख खानविरोधात गुन्हा दाखल, विक्रम सिंग या विक्रेत्याने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाचे निर्देश

Filed Against Shahrukh Khan | शाहरूख खानविरोधात गुन्हा दाखल

शाहरूख खानविरोधात गुन्हा दाखल

>ऑनलाइन लोकमत
कोटा, दि. 15 - अभिनेता शाहरुख खानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रईस सिनेमाच्या प्रमोशनवेळी कोटा रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या संपत्तीला नुकसान पोहोचवण्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे. जीआरपीच्या अधिका-याने याबाबत माहिती दिली. 
 
रेल्वेच्या एका न्यायालयाच्या निर्देशानुसार शाहरूखविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला .  कोटा रेल्वे स्थानकावरील विक्रम सिंग या विक्रेत्याने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने शाहरूखविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. 
 
काय आहे तक्रार-
23जानेवारी रोजी शाहरूखची गाडी रेल्वे स्थानकावर आली असता त्याच्या चाहत्यांनी गोंधळ घातला. ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसच्या दरवाजात उभं राहून शाहरूखने त्याच्या चाहत्यांच्या दिशेने काही वस्तू फेकल्या, त्या वस्तू मिळवण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी धावपळ केली आणि गोंधळ निर्माण झाला. या दरम्यान विक्रम सिंगच्या दुकानाचं नुकसान झालं आणि तो स्वतःही जखमी झाला असं त्याने तक्रारीत म्हटलं आहे. 
 

Web Title: Filed Against Shahrukh Khan