फिगोची ॲस्पायर मोहरीर फोर्डमध्ये दाखल
By Admin | Updated: August 13, 2015 23:24 IST2015-08-13T23:24:11+5:302015-08-13T23:24:11+5:30
नाशिक : नवीन तंत्रज्ञान आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी अशी फिगोची ॲस्पायर कार मुंबई-आग्रारोडवरील मोहरीर फोर्ड या शोरूममध्ये दाखल झाली आहे. शोरूमचे संचालक प्रकाश मोहरीर व वसुंधरा मोहरीर यांच्या हस्ते ॲस्पायरचे अनावरण करण्यात आले.

फिगोची ॲस्पायर मोहरीर फोर्डमध्ये दाखल
न शिक : नवीन तंत्रज्ञान आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी अशी फिगोची ॲस्पायर कार मुंबई-आग्रारोडवरील मोहरीर फोर्ड या शोरूममध्ये दाखल झाली आहे. शोरूमचे संचालक प्रकाश मोहरीर व वसुंधरा मोहरीर यांच्या हस्ते ॲस्पायरचे अनावरण करण्यात आले.प्रीमियर वर्गासाठी कार बनवणार्या फोर्ड कंपनीने आपल्या नव्या सेडान फिगो ॲस्पायरची निर्मिती केली आहे. या मॉडेलमध्ये सुरक्षेवर अधिक भर देण्यात आला आहे. कारमध्ये दोन एअरबॅग आणि अपग्रेड कारमध्ये सहा एअरबॅग बसवण्यात आल्या आहेत. डिझेल आणि पेट्रोल अशा दोन्ही व्हर्जनमध्ये ॲस्पायर उपलब्ध आहे. कारला नवीन १.२ लीटर टीआय-व्हीसीटी पेट्रोल इंजिन असल्यामुळे १८.२ इतकी तर १.५ लिटर डिझेल असल्यामुळे २५.८ कि .मी. असे कारचे मायलेज मिळते. नवीन फिगो ॲस्पायर सात रंगात उपलब्ध आहे. त्यात रूपी रेड, स्पारकिंग गोल्ड, ऑक्सफर्ड व्हाइट, ब्लॅक, दीप इम्लॉक्ट ब्ल्यू, इनगोट सिल्व्हर, स्मोक ग्रे असे रंग उपलब्ध आहेत. आकर्षक लूक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कार बनवण्यात आली आहे. नवीन तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे १५ ॲडिशनल फिचर कारमध्ये देण्यात आले आहेत. चालवण्यासाठी स्मूथ आणि आरामदायी असल्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना ही कार पसंत पडेल, असे मत मोहरीरचे संचालक प्रकाश मोहरीर यांनी व्यक्त केले.