शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या सीमेजवळ लढाऊ विमाने होणार तैनात; न्योमा एअरफिल्ड होणार अपग्रेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 08:58 IST

नवी एअरफिल्ड आणि लष्करी सुविधांच्या निर्मितीचे काम सीमा रस्ते संघटनेतर्फे करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली: चीनचा वाढता धोका लक्षात घेता भारतानेही प्रत्युत्तर देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. सीमेजवळच्या एअरफिल्ड्स अपग्रेड करण्यात येणार आहेत. प्रत्यक्ष ताबारेषेच्या जवळ असलेल्या न्योमा अॅडव्हान्स लैंडिंग ग्राउंड (एएलजी) अपग्रेड करण्याच्या कामाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली. हे काम पूर्ण झाल्यानंतर चीनच्या कोणत्याही हालचालींना तातडीने प्रत्युत्तर देणे शक्य होणार आहे. नवी एअरफिल्ड आणि लष्करी सुविधांच्या निर्मितीचे काम सीमा रस्ते संघटनेतर्फे करण्यात येणार आहे.

न्योमा एअरफिल्डचे महत्त्वगलवान संघर्षानंतर वाढलेल्या तणावादरम्यान सैनिक आणि इतर लष्करी साहित्य सीमेजवळ लवकर नेण्यासाठी न्योमा एअरफिल्डचा वापर करण्यात आला होता. येथे चिनूक हेवी लिफ्ट हेलिकॉप्टर्स आणि सी- १३०जे ही विमानेदेखील उतरविण्यात आली होती. चीनच्या सीमेपासून ही एअरफिल्ड केवळ ५० किलोमीटर अंतरावर आहे.

हवाई दलाची क्षमता वाढणार- सरकारकडून एअरफिल्डच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. आता तातडीने लढाऊ विमानांच्या तैनातीसाठी अपग्रेड करण्याचे काम सुरु होणार आहे.- लढाऊ विमानांचे संचलन येथून सुरु झाल्यास हवाई दलाचे सामर्थ्यात वाढणार आहे. शत्रूने कोणतेही वाकडे पाऊल टाकल्यास तत्काळ प्रत्युत्तर देता येईल. 

भारत-अमेरिकेचा चीनलगत युद्धसरावभारत-चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनला लागून असलेल्या सीमाभागात भारत व अमेरिकेचे लष्कर संयुक्त युद्धसराव करणार आहे. दोन्ही देशांचे लष्कर १५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत उत्तराखंडमधील औली भागात हा युद्धसराव करणार आहे. हा प्रदेश प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून १०० किमी दूर अंतरावर आहे. एकूण सातशे सैनिक त्यात सहभागी होतील.

टॅग्स :fighter jetलढाऊ विमानchinaचीनIndiaभारतindia china faceoffभारत-चीन तणाव