शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

फायटर जेट, सबमरीन 'Made in India' असेल, तरच परदेशी कंपन्यांना मिळणार अब्जावधी डॉलर्सचे कॉन्ट्रॅक्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 13:59 IST

येत्या काळात भारतीय सैन्य दलांना आपल्या ताफ्यात अत्याधुनिक लढाऊ विमाने, शस्त्रसज्ज गाडया, पाणबुडया आणि हेलिकॉप्टर्सचा समावेश करावा लागणार आहे.

ठळक मुद्देअब्जावधी डॉलर्सचा हा व्यवहार त्याचवेळी प्रत्यक्षात येईल जेव्हा हे सर्व साहित्य 'मेड इन इंडिया' असेल. जगातील शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा आयतदार देश असलेल्या भारताने शस्त्रास्त्रांच्या खरेदीसाठी नवीन धोरण आखले आहे.

नवी दिल्ली, दि. 21 - चीन आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांकडून असलेला धोका लक्षात घेता येत्या काळात भारतीय सैन्य दलांना आपल्या ताफ्यात अत्याधुनिक लढाऊ विमाने, शस्त्रसज्ज गाडया, पाणबुडया आणि हेलिकॉप्टर्सचा समावेश करावा लागणार आहे. ही सर्व सामग्री खरेदी करण्यासाठी भारताची योजना देखील तयार आहे. पण अब्जावधी डॉलर्सचा हा व्यवहार त्याचवेळी प्रत्यक्षात येईल जेव्हा हे सर्व साहित्य 'मेड इन इंडिया' असेल. 

जगातील शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा आयतदार देश असलेल्या भारताने शस्त्रास्त्रांच्या खरेदीसाठी नवीन धोरण आखले आहे. नव्या धोरणात संरक्षण साहित्यांची निर्मिती करणा-या कंपन्यांना भारतात येऊन कारखाने सुरु करण्याची अट घालण्यात आली आहे. पाणबुडया निर्मितीच्या कार्यक्रमासाठी येत्या जुलै महिन्यात निविदा काढण्यात येतील.

या धोरणामुळे भारतात रोजगार निर्मितीला चालना मिळेल तसेच, मुख्य संरक्षण तंत्रज्ञान भारताला मिळेल. अनेक परदेशी कंपन्यांनीही नवीन धोरणानुसार शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये रस दाखवला आहे. युरोपियन ग्रुप एअरबस भारताला पँथर हेलिकॉप्टर्स विकण्याचा प्रयत्न करत आहे.  भारताकडून अब्जावधील डॉलर्सचे कंत्राट मिळाले तर, इथेच मुख्य केंद्र स्थापन करु असे एअरबसने म्हटले आहे. 

दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेतील लॉकहीड मार्टिन कंपनीने भारतात एफ-16 लढाऊ विमाने बनवण्याची घोषणा केली होती. यासंबंधी लॉकहीड मार्टिन आणि टाटा उद्योग समूहातील टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स या कंपन्यांमध्ये येथे सुरू असलेल्या ‘पॅरिस एअर शो’मध्ये सोमवारी अधिकृत करार झाला.या करारानुसार लॉकहीड मार्टिन कंपनी ‘एफ-१६’ विमानांचे उत्पादन करणारा त्यांचा अमेरिकेच्या टेक्सास राज्यात फोर्ट वर्थ येथे असलेला संपूर्ण कारखाना भारतात स्थलांतरित केला जाणार आहे. भारतातील कारखाना लॉकहीड मार्टिन व टाटा कंपनी संयुक्तपणे चालवतील. तेथे भारतीय हवाई दलाखेरीज जगातील इतर देशांना निर्यात करण्यासाठीही ‘एफ-१६’ लढाऊ विमानांचे उत्पादन केले जाईल.

जुन्या विमानांची जागा घेण्यासाठी भारतीय हवाई दलास शेकडो नवी लढाऊ विमाने घ्यावी लागणार आहेत. लॉकहीड मार्टिन कंपनीसही ही अब्जावधी डॉलरची ‘ऑर्डर’ मिळविणे गरजेचे होते. परंतु मोदी सरकारने लष्करी साहित्याची परदेशातून तयार स्वरूपात खरेदी न करता त्या उत्पादकांना त्यांच्या मालाचे उत्पादन भारतात करण्याची अट घातली. देशाची गरज भागावी व त्याचसोबत नवे तंत्रज्ञान देशात येऊन स्थानिक उद्योगांचा बळकटी मिळावी हा यामागचा उद्देश होता.

टॅग्स :Indiaभारत