शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी पंतप्रधानांच्या भाजपा कार्यकर्त्यांना पाच महत्त्वाच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 13:07 IST

CoronaVirus भाजपाच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त मोदींचा कार्यकर्त्यांशी संवाद

नवी दिल्ली: भारतीय जनता पार्टीच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केलं. कोरोना विषाणूशी सुरू असलेल्या युद्धात योगदान देण्याचं आवाहन त्यांनी केलं. कोरोनाविरुद्धची लढाई दीर्घकाळ सुरू राहणार आहे. त्यामुळे न थकता, न हरता प्रयत्न करत राहायचंय. आपल्याला ही लढाई जिंकायची आहे, असा निर्धार मोदींनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसमोर काही संकल्पना ठेवल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी काम करण्याचं आवाहन केलं.कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारनं अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं आणि त्यांची अंमलबजावणी सुरू केल्याची माहिती मोदींनी कार्यकर्त्यांना दिली. कोरोनाचा परिणाम प्रत्येकावर होतो. मात्र प्रत्येकाला याची कल्पना नसते. कोरोनाशी लढण्यासाठी विमानतळावर स्क्रीनिंग, अनेक देशांतून येणाऱ्या लोकांवर निर्बंध, वैद्यकीय सुविधा मजबूत करण्याचं काम सुरू सरकारनं केल्याचं मोदी म्हणाले. पक्षापेक्षा देश मोठा असून तो १३० कोटी लोकांचा आहे, ही शिकवण भाजपा कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे. या संकटाच्या काळात भाजपा कार्यकर्त्यांनी काय करायला हवं याबद्दलच्या सूचनादेखील त्यांनी दिल्या. कार्यकर्त्यांनी त्यादृष्टीनं काम करावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

- गरिबांना अन्नधान्य पुरवण्यासाठी सेवा अभियान- एखाद्याच्या मदतीसाठी जाताना फेस मास्क जरुर वापरा. ही सवय ठेवा. स्वत:सोबतच इतरांसाठीही फेस मास्क तयार करा.- डॉक्टर, पोलीस, नर्स, सरकारी कर्मचाऱ्यांचे आभार माना. त्यासाठी त्यांना पत्र लिहा- आरोग्य सेतु ऍप डाऊनलोड करा आणि इतरांनादेखील करण्यास सांगा. कमीत कमी ४० जणांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतु डाऊनलोड करा.- लाखो लोक पीएम केअर्स फंडमध्ये दान करत आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी यामध्ये दान करावं आणि इतर ४० जणांनाही दान करण्यास सांगावं.- प्रत्येक कार्यकर्त्यानं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करानं आणि इतरांनादेखील करण्यास सांगावं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा