शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवालांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस, पंतप्रधानांच्या निवासस्थाबाहेर घेराव घालण्याचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 14:21 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या धरणे आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आंदोलन करत आहे.

ठळक मुद्देअरविंद केजरीवाल यांच्या धरणे आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस पंतप्रधानांच्या निवासस्थाबाहेर घेराव घालण्याचा निर्णय आंदोलनामुळे नायब राज्यपालांचे घरातून कामकाज

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या धरणे आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आंदोलन करत आहे. मात्र, या आंदोलनामुळे नायब राज्यपाल अनिल बैजल गेल्या चार दिवसांपासून आपल्या घरातून काम करत आहेत. केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याला मारहाण झाली होती. याविरोधात दिल्लीतील 'आयएएस' अधिकाऱ्यांनी संप पुकारला आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. हा संप मागे घेण्यासाठी राज्यपाल अनिल बैजल यांनी मध्यस्थी करावी, अशी मागणी करत केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारपासून नायब राज्यपालांच्या कार्यालयात धरणे आंदोलन सुरू केले आहे. आम्ही गेले चार दिवस राज्यपालांच्या कार्यालयातच बसलो आहोत, मात्र चार मिनिटांचीही भेटण्याची वेळ मिळालेली नाही. पंतप्रधान मोदी यात लक्ष घालतील, अशी अपेक्षा आहे, असे आम आदमी पार्टीच्या सत्येंद्र जैन यांनी ट्विट केले.

दरम्यान, आम आदमी पार्टीने नायब राज्यपाल अनिल बैजल या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थाबाहेर घेराव घालण्याचा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळी पाच वाजता रेशनच्या घरपोच सुविधेसाठी पार्टीचे सर्व आमदार तांदळाचे एक-एक पॅकेट पंतप्रधानांना पाठविणार आहेत.   

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपNew Delhiनवी दिल्लीNarendra Modiनरेंद्र मोदी