गुजरातमध्ये सुरू होणार एनएसजीचे पाचवे केंद्र
By Admin | Updated: December 1, 2014 00:06 IST2014-12-01T00:06:01+5:302014-12-01T00:06:01+5:30
केंद्र सरकारने गुजरातमध्ये दहशतवादविरोधी राष्ट्रीय सुरक्षा पथक (एनएसजी) चे केंद्र स्थापन करण्याला मंजुरी दिली आहे. मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या सहा वर्षांनंतर

गुजरातमध्ये सुरू होणार एनएसजीचे पाचवे केंद्र
नवी दिल्ली : केंद्र सरकारने गुजरातमध्ये दहशतवादविरोधी राष्ट्रीय सुरक्षा पथक (एनएसजी) चे केंद्र स्थापन करण्याला मंजुरी दिली आहे. मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या सहा वर्षांनंतर सरकारने गुजरातमध्ये एनएसजी केंद्र स्थापन करण्यास परवानगी दिली आहे. मुंबई हल्ल्यानंतर देशात अनेक ठिकाणी असे एनएसजी केंद्र स्थापन करण्यात आले होते.
गुजरातमध्ये हे एनएसजी कमांडो केंद्र गांधीनगरजवळच्या रांदेगाव येथे ४१ एकर जागेत स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्रात एनएसजीची विशेष दहशतवादविरोधी आणि अपहरणविरोधी शाखा स्थापन केली जाईल. अशा प्रकारचे एक केंद्र आधीच मुंबईत कार्यरत आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)