पंधरा अतिरेकी राजस्थानात घुसण्याच्या तयारीत
By Admin | Updated: August 30, 2014 02:25 IST2014-08-30T02:25:36+5:302014-08-30T02:25:36+5:30
पाकिस्तानी सैन्याच्या कुरापती सुरूच असताना अतिरेक्यांचा एक गट राजस्थानात घुसण्याच्या तयारीत

पंधरा अतिरेकी राजस्थानात घुसण्याच्या तयारीत
जयपूर : पाकिस्तानी सैन्याच्या कुरापती सुरूच असताना अतिरेक्यांचा एक गट राजस्थानात घुसण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती मिळताच राजस्थान पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सीमाभागातून १५ अतिरेकी भारतीय हद्दीत घुसण्यासाठी संधीच्या शोधात असल्याची माहिती मिळताच बीएसएफने गस्त
वाढविली आहे.