मुंबई - राजधानी दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात भीषण आगीची घटना घडली असून जवळपास १३० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यानंतर, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जिवीतहानी झाली नाही.
रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.