शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे भीषण चकमक, लष्कराच्या कॅप्टनला वीरमरण, ४ दहशतवाद्यांचा खात्मा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 14:08 IST

Encounter In Doda: जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे भारतीय लष्कर (Indian Army) आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू असून, या चकमकीत भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याला वीरमरण आलं आहे. तर या चकमकीत चार दहशतवाद्यांना (terrorists) कंठस्नान घालण्याल आलं आहे.

जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू असून, या चकमकीत भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याला वीरमरण आलं आहे. तर या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याल आलं आहे. डोडा जिल्ह्यात सुरू असलेल्या चकमकीदरम्यान, भारतीय लष्कराच्या एका कॅप्टनला वीरमरण आलं आहे, अशी माहिती एका संरक्षण अधिकाऱ्याने दिली आहे.  

डोडा येथील पटनीटॉपमधील जंगलामध्ये सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये काल संध्याकाळपासून चकमक सुरू आहे. येथून दहशतवादी हत्यारं सोडून पळाले होते, अशी माहिली लष्करानं दिली आहे घटनास्थळावरून अमेरिकन बनावटीची एम४ रायफल जप्त करण्यात आली आहे. तर तीन बॅगमधून काही स्फोटकंही सापडली आहेत. दरम्यान, हे दहशतवादी अकर भागातील एका नदीकिनारी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानंतर जवानांनी या भागाला घेराव घातला. लष्कराच्या हालचालींची कुणकूण लागल्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबारात लष्कराचे एक वरिष्ठ अधिकारी गोळ्या लागून गंभीर जखमी झाले. नंतर त्यांचा मृत्यू झाला.

काश्मीरमद्ये मागच्या पाच दिवसांमध्ये झालेली ही चौथी चकमक आहे. यापूर्वी ११ ऑगस्ट रोजी किश्तवाड जिल्ह्यातील जंगलामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. तर याच दिवशी उधमपूरमधील वसंतगडधील जंगलातही लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला होता. तर १० ऑगस्ट रोजी अनंतनागमधील कोकरानाग येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात हवालदार दीपक कुमार यादव आणि लान्स नायक प्रवीण शर्मा यांना हौतात्म आलं होतं. तर ३ जवान आणि दोन नागरिक जखमी झाले होते.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्ला