दोघांवर प्राणघातक हल्ला
By admin | Updated: February 16, 2015 23:55 IST
गंभीर जखमी : चायनीजच्या ठेल्यावर वाद
दोघांवर प्राणघातक हल्ला
गंभीर जखमी : चायनीजच्या ठेल्यावर वादनागपूर : चायनीजच्या ठेल्यावर झालेल्या वादाचे पर्यवसान दोघांवरील हल्ल्यात झाले. यात एक तरुण गंभीर जखमी झाला. नीरज ताराचंद पयासी (वय २८, रा. राजीवनगर) आणि संजय सुरेश दुरांगे (वय २०, रा़ राजीवनगर) हे दोघे नूडल्स खाण्याकरिता रविवारी रात्री ७ वाजता एमआयडीसीतील सोनी चायनीज संेटरवर गेले होते़ तेथे त्यांचा दद्दा आणि मुन्ना (दोन्ही रा़ आयसी चौक) तसेच त्यांच्या दोन साथीदारांशी वाद झाला. आरोपींनी नीरज आणि संजयच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला़ काहींनी हा वाद सोडवून जखमींना रुग्णालयात नेले असता आरोपींनी त्यांना पुन्हा आयसी चौकात अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता लता मंगशेकर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे. लकडगंजमध्येही घटना अशाच प्रकारे रविवारी दुपारी ४.३० वाजता दीपक अशोककुमार जैन (वय २८) यांच्यावर आरोपी युवराज सुरेश राणा (वय २९) आणि सुरेश घनश्याम राणा (वय ६२) या दोघांनी चाकूने हल्ला केला. त्यांनी चाकू पकडून ठेवल्यामुळे ते बचावले. आरोपींनी जैन यांना अश्लील शिवीगाळ करून जीवानिशी ठार मारण्याची धमकी दिली़ जैन यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. ----