हिरावाडीत मोकाट श्वानांचा उपद्रव

By Admin | Updated: May 8, 2014 14:42 IST2014-05-08T14:42:32+5:302014-05-08T14:42:32+5:30

महापालिकेचे दुर्लक्ष : नागरीक त्रस्त

The fiasco of the Hirawadi furious squares | हिरावाडीत मोकाट श्वानांचा उपद्रव

हिरावाडीत मोकाट श्वानांचा उपद्रव

ापालिकेचे दुर्लक्ष : नागरीक त्रस्त

पंचवटी : येथिल हिरावाडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट श्वानांचा उपद्रव वाढल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. महापालिकेच्या वतीने मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मोकाट श्वानांमुळे नागरीकांना रात्रीच्यावेळी रस्त्याने घराकडे मार्गक्रमण करतांना जरा सांभाळूनच जावे लागत आहे. तर घोळक्याने उभे राहणारे श्वान रस्त्याने मार्गक्रमण करणार्‍या दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या पिच्छा करीत असल्यामुळे वाहनधारक पुढे अन श्वान मागे असे चित्र दिसुन येते. रस्त्याने येजा करणार्‍यांवर श्वान भुंकत असल्याने नागरीकांची तर चांगलीच धांदल उडते. त्यामुळे श्वान भुंकायला लागल्यावर नागरीकांना हातात दगड, विटा घेऊनच मार्गक्रमण करावे लागते. मोकाट श्वानांमुळे नागरीक त्रस्त झालेले असले तरी महापालिका प्रशासन कोणतीही दखल घेत नसल्याची तक्रार नागरीकांनी केली आहे. सध्या परिसरातील शक्तीनगर, भगवतीनगर, लाटेनगर, त्रिकोणी बंगला परिसर, कळसकर नगर, शिवकृपानगर या भागात श्वानांचा उपद्रव वाढला असल्याने प्रशासनाने श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: The fiasco of the Hirawadi furious squares