निवडणूक बिनविरोध करण्यास काहीअंशी यश
By Admin | Updated: July 31, 2015 22:25 IST2015-07-31T22:25:12+5:302015-07-31T22:25:12+5:30
वडगाव काशिंबेग : आठ जागा बिनविरोध; तीन जागांसाठी होणार निवडणूक

निवडणूक बिनविरोध करण्यास काहीअंशी यश
व गाव काशिंबेग : आठ जागा बिनविरोध; तीन जागांसाठी होणार निवडणूकमंचर : वडगाव काशिंबेग ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना काहीअंशी यश आले आहे. तीन प्रभागांतील आठ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या असून, चार क्रमांकाच्या प्रभागातील तीन जागांसाठी निवडणूक होत आहे. येथे सहा उमेदवार रिंगणात आहे.वडगाव काशिंबेग गावाने विविध कार्यकारी सेवा सोसायटी तसेच श्रीकृष्ण पतसंस्थेची निवडणूक यापूर्वी बिनविरोध केली आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न होता. त्यासाठी सर्वपक्षीय बैठका झाल्या ग्रामपंचायतीच्या ११ जागा आहेत. तीन प्रभाग बिनविरोध करण्यात यश आले. मात्र, प्रभाग चारमध्ये एकमत न झाल्याने तेथे तीन जागांसाठी निवडणूक होत आहे. प्रभाग चारमध्ये शिवसेना पुरस्कृत पॅनलचे उमेदवार : सचिन शांताराम टेके, दत्तात्रय रामदास पिंगळे, उषा हरिश्चंद्र पिंगळे व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचे उमेदवार : अनिल दत्तात्रय मानकर, ज्ञानेश्वर बबन वाळुंज, लता महादू दैने यांच्यात सरळ सरळ लढत होत आहेत. (वार्ताहर)(चौकट)बिनविरोध निवडून आलेले उमेदवार : प्रभाग १ : रुख्मिणी पुनाजी खंडागळे, सुनंदा सुनील वाळुंज, विजया मारुती लोखंडे. प्रभाग २ : संजय त्रिंबक डोके, सोनाली नारायण भय्ये.प्रभाग ३ : सुरेखा कुंडलिक घोडेकर, बाबाजी ज्ञानेश्वर दैने, ललिता वामन डोके, यांची बिनविरोध निवड झाली आहे. वडगाव काशिंबेग गावचे सरपंचपद अनुसूचित जमाती महिला वर्गासाठी राखीव असून, रुख्मिणी पुनाजी खंडागळे यांची निवड निश्चित मानली जात आहे.