शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार खत, सबसिडीचे पॅकेज मंजूर; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 06:34 IST

या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर ३८५० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बुधवारी (दि. १) हा निर्णय घेण्यात आला. 

नवी दिल्ली : डी-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) खताच्या किरकोळ किमती प्रति ५० किलोच्या १३५० रुपये इतका कायम ठेवण्यासाठी ३१ डिसेंबर २०२४ या तारखेनंतरही अतिरिक्त अनुदान देण्याचा कालावधी केंद्र सरकारने वाढविला आहे. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर ३८५० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बुधवारी (दि. १) हा निर्णय घेण्यात आला.  गेल्यावर्षी केंद्र सरकारने १ एप्रिल २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीपर्यंत प्रतिटन ३५०० दराने डीएपी खतासाठी मर्यादित स्वरूपातील विशेष अनुदान पॅकेज जाहीर केले होते. त्यामुळे सरकारी तिजोरीवर २६२५ कोटी रुपयांचा बोजा पडला होता. हे अनुदान केंद्र सरकारच्या विद्यमान न्यूट्रिएंट बेस्ड् सबसिडी (एनबीसी) योजनेशिवाय अतिरिक्त स्वरूपात देण्यात आले होते. डीएपी खतासाठी पूर्वी मंजूर विशेष अनुदानाचा कालावधी १ जानेवारी २०२५पासून पुढील आदेश मिळेपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला. याबाबत केंद्र सरकारने सांगितले की, शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात डीएपी खत उपलब्ध व्हावे हा या निर्णयामागे विचार आहे. 

शेतकरी हिताचे संरक्षण करण्यावर भरकेंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना डीएपी खत १३५० रुपये प्रतिबॅग या दराने यापुढे मिळत राहील. अतिरिक्त भार केंद्र सरकार उचलणार आहे. वैष्णव यांनी म्हटले की, जागतिक बाजारपेठेतील डीएपी खताच्या किमतींमध्ये भूराजकीय परिस्थितीमुळे अस्थिरता आहे; पण सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यावर भर दिला आहे. केंद्र सरकारने २८ प्रकारची फॉस्फेटिक आणि पोटॅसिक खतांवरही सबसिडी दिली आहे. ही सबसिडी १ एप्रिल २०१०पासून लागू असलेल्या एनबीएस योजनेद्वारे देण्यात येते. 

दोन पीकविमा योजनांना मुदतवाढप्रधानमंत्री पीकविमा योजना (पीएमएफबीवाय) आणि आरडब्ल्यूबीसीआयएस या दोन पीकविमा योजनांची मुदत केंद्र सरकारने आणखी एक वर्षाने वाढविली आहे. त्यामुळे ही योजना आता २०२५-२६ या वर्षापर्यंत अंमलात असणार आहे.

या योजनांच्या अंमलबजावणीकरिता तंत्रज्ञानाच्या वापरासाठी ८२४.७७ कोटी रुपयांचा स्वतंत्र निधी तयार करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत (सीसीइए) हा निर्णय घेण्यात आला.

२०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीपर्यंत पीएमएफबीवाय आणि आरडब्ल्यूबीसीआयएस या योजनांचा निधी ६९,५१५.७१ कोटी रुपये आहे. २०२०-२०२१ ते २०२४-२५ या कालावधीत हा निधी ६६५५० कोटी रुपये होता. 

२००४ ते २०१४पेक्षा सबसिडीचे दुप्पट प्रमाण२०१४ ते २०२४ या दशकात मोदी सरकारने खतांसाठी ११.९ लाख कोटींची रुपयांची सबसिडी दिली आहे. ही रक्कम २००४ ते २०१४ या कालावधीतील याच प्रकारच्या ५.५ लाख कोटी रुपयांच्या सबसिडीपेक्षा दुप्पट आहे. शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामासाठी परवडणाऱ्या दरात डीएपी खत उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

नव्या वर्षातील पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी : पंतप्रधान नरेंद्र मोदी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले की,  केंद्र सरकारचा नव्या वर्षातील पहिला निर्णय हा शेतकऱ्यांना समर्पित आहे.- केंद्रीय मंत्रिमंडळाने पीकविमा योजनेला मुदतवाढ दिली असून, डीएपी खताच्या सबसिडीत वाढ केली.- त्यामुळे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत खत मिळणार आहे. डीएपीवरील एक वेळचे विशेष पॅकेज एनबीएस सबसिडीच्या प्रतिटन ३५०० रुपयांपेक्षा अधिक वाढविण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. 

टॅग्स :FarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी