नियम धाब्यावर बसवून विक्रेत्यांकडून फळविक्री

By Admin | Updated: May 9, 2014 18:10 IST2014-05-09T18:10:50+5:302014-05-09T18:10:50+5:30

पिंपळगाव बसवंत : शहरातील फळ विक्रेत्यांकडून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेल्या कृत्रिमरीत्या पिकविलेल्या फळांची विशेषत: आंब्यांची राजरोसपणे विक्री केली जात आहे.

Fertilizer sales from vendors by the rules | नियम धाब्यावर बसवून विक्रेत्यांकडून फळविक्री

नियम धाब्यावर बसवून विक्रेत्यांकडून फळविक्री

ंपळगाव बसवंत : शहरातील फळ विक्रेत्यांकडून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेल्या कृत्रिमरीत्या पिकविलेल्या फळांची विशेषत: आंब्यांची राजरोसपणे विक्री केली जात आहे.
पिंपळगाव बसवंत हे मोठे शहर असून, ४० खेड्यांची मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी रोज शेकडो क्विंटल आंबा विक्री होत असतो. शहरात विविध ठिकाणी आंब्यांचे गोडावून असून, या ठिकाणी कॉल्शियम कार्बरईड टाकून मोठ्या प्रमाणात आंबा पिकवण्याची प्रक्रिया चालू असते. आरोग्य विभाग व अन्न प्रशासन सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करीत आहे.
याबाबत एका फळ विक्रेत्याने उघडपणे बोलून आम्ही सर्व सेटलमेंट करूनच धंदा करतो. अधिकारी लोकांचे सिझनच्या आधीच तोंड दाबून टाकतो. त्यांना हप्ता दिल्याशिवाय धंदा कसा चालेल, अशा शब्दांत अन्नभेसळ खात्यांचा कारभार चव्हाट्यावर आणला. नाशिक येथे गोडावूनवर धाडी पडत असताना मोठ्या बाजारपेठांमध्ये रोज फळविक्रेते नियम धाब्यावर बसवून कृत्रिमरीत्या पिकवलेला माल विक्री करतात कसे, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. (वार्ताहर)

Web Title: Fertilizer sales from vendors by the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.