शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सनी देओल यांचा महिलेने घेतला किस, व्हिडिओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 20:46 IST

सनी देओल यांनी बटालामध्ये रोड शो केला.

बटाला : अभिनेता सनी देओल राजकीय मैदानात उतरले आहेत. त्यांना भाजपाने पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सनी देओल यांनी प्रचाराला जोर धरला आहे. दरम्यान, गुरुवारी सनी देओल यांनी बटालामध्ये रोड शो केला. यावेळी त्यांच्या एका समर्थक महिलेने सनी देओल यांच्या गालाचा किस घेतला. यासंबंधीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.    

बटालामध्ये सनी देओल यांनी गुरुवारी रोड शो केला. या रोड शो दरम्यान अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी एक महिला सनी देओल यांच्या ट्रकवर चढली आणि त्यांची गळाभेट घेत त्यांच्या गालाचा किस घेतला. दरम्यान, ती महिला ट्रकवर चढताना लोकांना वाटले की सनी देओल यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी चढत असेल. मात्र, झाले अले की तिने सनी देओल यांच्या गालाचा किस घेतल्याने सर्वजण गोंधळून गेले.  

दरम्यान, अभिनेता विनोद खन्ना यांच्या निधनानंतर भाजपाने अभिनेता सनी देओल यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. त्यांना पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदार संघातून भाजपाने उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता राजकीय आखाड्यात सनी देओल आपले नशीब आजमावणार आहेत. सनी देओल यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड यांचे आव्हान आहे. सुनील जाखड विद्यमान खासदार आहेत. 

हिन्दुस्तान जिंदाबाद था, है, और रहेगा!, मोदींच्या हातात 'ढाई किलोचा हात'अभिनेता सनी देओलने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यावेळी मोदींनी सनी देओल सोबतचा आपला फोटो ट्विटरवर शेअर करत, आम्ही दोघेही 'हिंदुस्थान जिंदाबाद था, है, और रहेगा'साठी एकत्र असल्याचे म्हटले होते. 

सनी देओल फिल्मी, पण मी खरा फौजी; कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा टोलाअभिनेता सनी देओल यांच्यावर पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी निशाना साधला होता. यावेळी अमरिंदर सिंह यांनी सनी देओल केवळ फिल्मी असल्याचे सांगत, आपण असली फौजी असल्याचे म्हटले होते. यावर सनी देओलकडून  काहीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. 

टॅग्स :Sunny Deolसनी देओलLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSocial Viralसोशल व्हायरल