शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मुलाला चोरल्याच्या संशयातून जमावानं महिलेचा घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 09:27 IST

गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये जवळपास 700 लोकांच्या जमावानं एका 45 वर्षीय भिकारी महिलेला मारहाण करून तिचा जीव घेतला आहे.

अहमदाबाद- गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये जवळपास 700 लोकांच्या जमावानं एका 45 वर्षीय भिकारी महिलेला मारहाण करून तिचा जीव घेतला आहे. मारहाण केलेली महिला मुलांची चोरी करत असल्याचा जमावाला संशय होता. पोलिसांच्या माहितीनुसार, शांता देवी नावाची महिला इतर तीन सहकारी महिलांबरोबर भीक मागण्यास चालली होती.त्याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये अशी अफवा पसरली की, ही महिला मुलांची चोरी करते. त्यानंतर पाच ते सहा जणांनी तिच्यावर हल्ला चढवला. पाहता पाहता तिथे 700 लोकांचा जमाव गोळा झाला. काही जणांनी त्या भिकारी महिलेची केसं ओढली आणि तिला काठीनं मारहाण केली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत भिकारी महिलेला सरकारी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.गेल्या काही दिवसांपासून देशभरात मुलांची चोरी करत असलेल्या अफवेनं अनेकांना मारहाण करण्यात आलेली आहे. त्यामुळे राग अनावर झालेल्या जमावाच्या हल्ल्यात अनेक निर्दोष लोक मारले जात आहेत. आसाम, कर्नाटक, छत्तीसगडसह देशातील अनेक राज्यांमध्ये अशी प्रकरणं समोर आली आहेत. मेसेजवरून पसरवली जातेय अफवागेल्या तीन-चार दिवसांपासून एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्या क्लिपमध्ये जामनगर आणि द्वारकामध्ये 300 मुलांची चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याचं सांगितलं जातंय. अशा प्रकारच्या व्हायरल मेसेजमुळेच जमाव निर्दोष लोकांवर हल्ले करत आहेत. पोलिसांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असं सांगितलं आहे. अशा प्रकारची कोणतीही टोळी गुजरातमध्ये सक्रिय नाही. लोक सोशल मीडियातून अफवा पसरवत आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका, असा सल्ला पोलिसांनी जनतेला दिला आहे. 

टॅग्स :Deathमृत्यू