कर्तृत्वान महिलांचा सत्कार
By admin | Updated: March 15, 2015 00:07 IST
पुणे : विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणा-या महिलांचा सन्मान जाणता राजा प्रतिष्ठाणच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. आझम कँम्पस येथे आयोजित या कार्यक्रमासशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. महिला दिनाच्या निमित्ताने प्रतिष्ठाणच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
कर्तृत्वान महिलांचा सत्कार
पुणे : विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणा-या महिलांचा सन्मान जाणता राजा प्रतिष्ठाणच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. आझम कँम्पस येथे आयोजित या कार्यक्रमासशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. महिला दिनाच्या निमित्ताने प्रतिष्ठाणच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावेळी सामाजिक क्षेत्रासाठी आबेदा इनामदार,शिक्षण क्षेत्रासाठी सुमन शिंदे, राजकीय क्षेत्रासाठी डॉ. किरण मंत्री, सांस्कृतीक क्षेत्रासाठी संस्कृती बालगुडे तर क्रीडा क्षेत्रासाठी भाग्यश्री शिर्के यांचा गौरव करण्यात आला. सन्मानपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ असे या सत्काराचे स्वरूप होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाच्या नवनिर्वाचित सदस्यांचाही सत्कार करण्यात आल. प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष आबा शिरवाळकर, सचिव अँड. रफिक शेख, यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन दिनेश काळे, संदिप काकडे, योगेश पवार, सलीम शेख, उदय भेलके, सचिन चांगडे यांनी केले. तर सुत्रसंचालन मदन व्हवाळ यांनी केले. =========================