शिवाजी विद्यालयात गुणवंतांचा सत्कार
By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:43+5:302015-06-15T21:29:43+5:30
औसा : शहरातील शिवाजी माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सोमवारी सत्कार करण्यात आला.

शिवाजी विद्यालयात गुणवंतांचा सत्कार
औ ा : शहरातील शिवाजी माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सोमवारी सत्कार करण्यात आला. दहावी परीक्षेत शिवाजी विद्यालयाचा निकाल ८४.६० टक्के लागला आहे. अनुराधा माडजे, व्यंकटेश महामुनी, श्रद्धा खंडागळे, प्रतीक्षा कुलकर्णी, किरण सोनवणे, परमेश्वर माळी, रुपाली सूर्यवंशी, महादेव यादव, अभिषेक यादव, पूनम कटके, वैष्णवी गोसावी, गोवर्धन माने यांचा सत्कार झाला. यावेळी प्रा. विलास जाधव, एन.आर. भोसले, बी.व्ही. चौगुले, एम.एस. लव्हराळे, आर.एस. हसुबे, एन.व्ही. चिकटे, एस.एम. लोकरे, एस.डी. कुुलकर्णी, एस.व्ही. मोरे, डी.एम. कांबळे, बी.एन. शेवाळे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)