भरधाव स्कूल बसची धडक

By Admin | Updated: February 10, 2015 00:56 IST2015-02-10T00:56:26+5:302015-02-10T00:56:26+5:30

आईचा मृत्यू, मुलगी जखमी : अजनीत अपघात

Fearing School Bus | भरधाव स्कूल बसची धडक

भरधाव स्कूल बसची धडक

चा मृत्यू, मुलगी जखमी : अजनीत अपघात
नागपूर : भरधाव स्कूल बसची धडक लागल्यामुळे दुचाकीवरील एका महिलेचा करुण अंत झाला तर, मुलगी जखमी झाली. आज सकाळी ९.३० च्या सुमारास चंद्रमणी गार्डन मार्गावर हा भीषण अपघात घडला.
शारदा नीळकंठ नरांजे (वय ४८) आणि अभिलाषा (वय २१, रा. चंद्रनगर, अजनी) या मायलेकी आज सकाळी प्लेझर दुचाकीने मेडिकलकडे जात होत्या. आरोपी चंद्रशेखर अण्णाजी अहेर (वय ६३, रा. काशीनगर, अजनी) याने निष्काळजीपणे स्कूल बस (एमएच ४०/ एन ५३०३) चालवून दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे मायलेकी खाली पडून गंभीर जखमी झाल्या. या अपघातामुळे घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला. जमावाने आरोपी वाहनचालक अहेरला पकडून चोप दिला. काही जणांनी वाहनाच्या मागच्या बाजूने दगड मारले. मात्र, स्कूल बस असल्यामुळे जमावातील काहींनी दगड मारणाऱ्यांना आवरले. माहिती कळताच अजनी पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी अहेरला ताब्यात घेतले. दरम्यान, शारदा आणि अभिलाषा यांना मेडिकलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी शारदा नरांजे यांना मृत घोषित केले. अभिलाषाच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपी अहेरला अटक केली.
डोळ्यादेखत गेला जीव
जखमी अभिलाषा एसबी महाविद्यालयाची अभियांत्रिकीची विद्यार्थिनी आहे. शारदा यांना बरे नसल्यामुळे अभिलाषाने आईला आपल्या दुचाकीवर बसवले आणि औषधोपचारासाठी मेडिकलकडे निघाली. मात्र, औषधोपचाराची तिला संधीच मिळाली नाही. अभिलाषाच्या डोळ्यादेखतच तिच्या आईचा जीव गेला. या अपघातामुळे अभिलाषाला जबर मानसिक धक्का बसला असून, परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
----

Web Title: Fearing School Bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.