विदेशी गुंतवणुकीत 26 टक्के घसरण
By Admin | Updated: June 23, 2014 23:55 IST2014-06-23T23:55:22+5:302014-06-23T23:55:22+5:30
इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन या केंद्र सरकारच्या विभागाने प्रसिद्ध केली आहे. नव्या गुंतवणुकीचा नवा आकडा दोन अब्ज 32 कोटी इतका नोंदला गेला आहे.

विदेशी गुंतवणुकीत 26 टक्के घसरण
>नवी दिल्ली : देशात होणा:या थेट परकीय गुंतवणुकीत गेल्या पाच महिन्यांत प्रथमच लक्षणीय घट होत एप्रिल महिन्यात ही गुंतवणूक 26 टक्क्यांनी घटल्याची माहिती इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन या केंद्र सरकारच्या विभागाने प्रसिद्ध केली आहे. नव्या गुंतवणुकीचा नवा आकडा दोन अब्ज 32 कोटी इतका नोंदला गेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, परकीय गुंतवणूकदारांनी सेवा क्षेत्रला सर्वाधिक प्राधान्य दिल्याचे दिसले असून 38 कोटी 2क् लाख अमेरिकी डॉलर इतकी गुंतवणूक या क्षेत्रत झाली आहे. या पाठोपाठ हॉटेल क्षेत्रत 1क् कोटी 9क् लाख अमेरिकी डॉलर इतकी गुंतवणूक झाली आहे. तर धातू क्षेत्रत सात कोटी 2क् लाख अमेरिकी डॉलर व बांधकाम क्षेत्रत सहा कोटी 9क् लाख अमेरिकी डॉलर इतकी गुंतवणूक या क्षेत्रत झाली आहे. गुंतवणूकदारांच्या दृष्टीने प्राधान्य यादीत राहिलेल्या औषधनिर्मिती क्षेत्रतील गुंतवणुकीने एप्रिलमध्ये नीचांक गाठलेला आहे. या क्षेत्रत 1क् लाख अमेरिकी डॉलर इतकीच गुंतवणूक झाली आहे.
भारतामध्ये गुंतवणूक करणा:या देशांमध्ये मॉरिशसचा प्रथम क्रमांक असून तेथून 48 कोटी 9क् लाख अमेरिकी डॉलरची गुंतवणूक झाली आहे. त्यापाठोपाठ सिंगापूर (31 कोटी 6क् लाख अमेरिकी डॉलर), जपान (21 कोटी 4क् लाख अमेरिकी डॉलर), नेदरलँडस (1क् कोटी 1क् लाख अमेरिकी डॉलर) आणि अमेरिकेतून अवघी चार कोटी 3क् लाख
अमेरिकी डॉलर इतकी गुंतवणूक झाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)