शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

एफआरडीआय विधेयक बजेट अधिवेशनातही नाहीच, समितीला मुदतवाढ; ठेवीदारांना घातक असल्याने विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:46 IST

वादग्रस्त ‘वित्तीय समाधान व ठेव विमा विधेयका’चा अभ्यास करणा-या संयुक्त संसदीय समितीने अहवाल सादर करण्यासाठी आणखी वेळ मागून घेतल्याने हे विधेयक संसदेच्या २0१८च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही मांडले जाणार नाही, असे स्पष्ट झाले आहे.

नवी दिल्ली : वादग्रस्त ‘वित्तीय समाधान व ठेव विमा विधेयका’चा अभ्यास करणा-या संयुक्त संसदीय समितीने अहवाल सादर करण्यासाठी आणखी वेळ मागून घेतल्याने हे विधेयक संसदेच्या २0१८च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही मांडले जाणार नाही, असे स्पष्ट झाले आहे.लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितले की, ‘संसदीय समितीला २0१८च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत कालावधी वाढवून देण्यात आला आहे. १५ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करणे शक्य नसल्याचे सांगून समितीने मुदतवाढ मागितली होती. श्रद्धांजली वाहून सभागृह तहकूब झाल्यामुळे १५ डिसेंबर रोजी मुदतवाढीचा ठराव सभागृहात आणणे शक्य झाले नाही. त्यामुळे मी समितीला मुदतवाढ दिली.’ हे विधेयक आॅगस्टमध्ये लोकसभेत मांडले होते. काही तरतुदींवरून वाद निर्माण झाल्यानंतर हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे सोपविले होते.ग्राहकांना हमीच नसेल-विधेयकातील तरतुदीनुसार, बँकांना दिवाळखोरीत जाण्यापासून रोखण्यासाठी ‘समाधान महामंडळ’ (रिझोल्युशन) स्थापन करण्यात येणार आहे. हे महामंडळ बँकांवर देखरेख ठेवील. दिवाळखोरीत जाण्याची शक्यता असलेल्या बँकांना देणी माफ केली जाऊ शकतात.तरतुदीलाच संकटमोचक अथवा बेल-इन असे म्हटले गेले आहे. या तरतुदीचा सोपा अर्थ असा आहे की, बुडणाºया बँकांना ठेवीदारांचे सगळे पैसे देण्याचे बंधन राहणार नाही.लोकांचा आपल्याकडील जमा पैसा बँका देण्याचे नाकारू शकतात, अथवा त्याचे रूपांतर समभागांत करू शकतात. सध्या १ लाखापर्यंतच्या ठेवी ‘ठेव विमा आणि कर्ज हमी महामंडळ कायद्या’ने सुरक्षित आहेत. नवा कायदा लागू झाल्यानंतर ठेव हमी देणारा हा कायदा रद्द होईल.

टॅग्स :Parliamentसंसद