औषधनिर्माण क्षेत्रात एफडीआयला मंजुरी

By Admin | Updated: May 14, 2014 02:31 IST2014-05-13T23:40:36+5:302014-05-14T02:31:52+5:30

केकेआर या विदेशी कंपनीला औषधनिर्माण क्षेत्रात (फार्मा) ४० कोटी डॉलरच्या थेट विदेशी गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे.

FDI approval in pharmaceutical sector | औषधनिर्माण क्षेत्रात एफडीआयला मंजुरी

औषधनिर्माण क्षेत्रात एफडीआयला मंजुरी

नवी दिल्ली : केकेआर या विदेशी कंपनीला औषधनिर्माण क्षेत्रात (फार्मा) ४० कोटी डॉलरच्या थेट विदेशी गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या अंतिम बैठकीत या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे.
केकेआर ही कंपनी हैदराबादच्या ग्लांडफार्मा या कंपनीत ३७.९८ टक्के भागीदारीसाठी गुंतवणूक करेल. ही कंपनी ग्लांड सेल्सुस बायो केमिकल्स या कंपनीचेही २९.४ टक्के भागभांडवल खरेदी करेल. केकेआरच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावाला विदेशी गुंतवणूक संवर्धन मंडळाने फेब्रुवारीमध्ये मंजुरी दिली होती, मात्र १२०० कोटी पेक्षा जास्त रुपयांच्या गुंतवणुकीचा मुद्दा असल्यामुळे हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीकडे पाठविण्यात आला होता. सध्या औषधनिर्माण क्षेत्रात शंभर टक्के एफडीआयला मंजुरी असली तरी केवळ ग्रीनफिल्ड कंपन्यांसाठीच आहे. ब्राऊनफिल्ड कंपन्यांना विदेशी गुंतवणुकीसाठी एफआयपीबीच्या परवानगी बंधनकारक असते. (लोकमत न्यूजनेटवर्क)

Web Title: FDI approval in pharmaceutical sector