शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर... यंदा मॉन्सून दहा दिवस आधीच येणार, राज्यात धाे-धाे बरसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 04:01 IST

केरळमध्ये मॉन्सून २० किंवा २१ मे रोजी धडकणार, त्यानंतर पुढील १० दिवसांत महाराष्ट्रात बरसणार.

नवी दिल्ली : उष्णतेच्या लाटेमुळे देशभरात नागरिकांना  उन्हाचे तीव्र चटके बसत आहेत. मात्र, उन्हामुळे हैराण झालेल्या देशवासीयांसाठी दिलासादायक बातमी आहे. यावर्षी मान्सूनचे आगमन १० दिवस आधीच हाेण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. केरळमध्ये २० किंवा २१ मेपर्यंत मान्सून धडकणार असून पुढील १० ते १२ दिवसांमध्ये ताे महाराष्ट्रात दाखल हाेईल, असा अंदाज आहे.

दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये दाखल हाेताे. यावेळी त्याचे तब्बल १० दिवस आधीच आगमन हाेण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण हाेत आहे. सध्या ओडिशाच्या किनारपट्टीवर ‘आसानी’ चक्रीवादळ धडकले आहे. 

याशिवाय अरबी समुद्रात येत्या काही दिवसांमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण हाेण्याची स्थिती आहे. या दाेन्हीमुळे मान्सून वेगाने पुढे सरकण्याची स्थिती निर्माण हाेईल. परिणामी मान्सूनचे आगमन लवकर हाेऊ शकते. त्यामुळे उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना लवकर दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

युराेपियन संस्थेचा अंदाज‘युराेपियन सेंटर फाॅर मीडियम रेंज वेदर पेव्हकास्ट’ या संस्थेच्या अंदाजानुसार, बंगालमधील चक्रीवादळामुळे अरबी समुद्रातही कमी दाबाचा पट्टा निर्माण हाेत आहे. त्याच्या प्रभावाने मान्सून वेगाने पुढे सरकू शकताे. तसे झाल्यास केरळमध्ये पाऊस १० दिवस लवकरच बरसणार आहे.

९९% पावसाचा अंदाजहवामान खात्याने यंदा सरासरीच्या ९९ टक्के मान्सून बरसणार असल्याचा प्राथमिक अंदाज १४ एप्रिलला व्यक्त केला हाेता.  पावसाची दीर्घकालीन सरासरी ८७ सेंमी आहे. ला निना परिस्थिती अनुकूल असल्यामुळे मान्सून चांगला बरसणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले हाेते.  

राज्यात जाेर‘धारा’ महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असे हवामान खात्याने सांगितले आहे.

विषुववृत्ताजवळील एका विशिष्ट भागात ढगांची सक्रियता वाढली आहे. याचा उपखंडातील पर्जन्यमानावर परिणाम हाेत असताे. यंदा ते खूप सक्रिय असल्याने मान्सूनची वाटचाल वेगाने हाेण्याची चिन्हे आहेत. केरळमध्ये मान्सून १ जूनपर्यंत दाखल हाेईल.    आनंद कुमार दास, तज्ज्ञ, भारतीय हवामान खाते 

टॅग्स :KeralaकेरळMaharashtraमहाराष्ट्र