शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

'साध्वी प्रज्ञा सिंह यांनी मुस्लीम समाजाची माफी मागावी, तरच प्रचार करू'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 10:43 IST

मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या एकमेव मुस्लीम उमेदवार फातिमा रसूल सिद्दीकी यांनी भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा प्रचार करण्यास नकार दिला आहे.

ठळक मुद्देमध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या एकमेव मुस्लीम उमेदवार फातिमा रसूल सिद्दीकी यांनी भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा प्रचार करण्यास नकार दिला.साध्वी प्रज्ञा  सिंह यांनी त्यांच्या मुस्लीमविरोधी विधानांसाठी माफी मागितली तरच मी त्यांचा प्रचार करण्यास तयार आहे, असे सिद्दीकी यांनी म्हटलं आहे. फातिमा रसूल सिद्दीकी या भोपाळमधील भाजपा नेत्या असून विधानसभा निवडणुकीत भाजपाने त्यांना भोपाळ उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती

भोपाळ - मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. साध्वी प्रज्ञा यांनी मुस्लीम समाजाची माफी मागावी, तरच त्यांचा प्रचार करू असं एका भाजपा नेत्यानी म्हटलं आहे. मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या एकमेव मुस्लीम उमेदवार फातिमा रसूल सिद्दीकी यांनी भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. साध्वी प्रज्ञा सिंह यांनी त्यांच्या मुस्लीमविरोधी विधानांसाठी माफी मागितली तरच मी त्यांचा प्रचार करण्यास तयार आहे, असे सिद्दीकी यांनी म्हटलं आहे. 

'मी साध्वी प्रज्ञा यांच्यासाठी प्रचार करणार नाही, त्यांनी धर्मयुद्धासंदर्भात विधान केले होते. 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्यासंदर्भातही त्यांनी वादग्रस्त विधान केले होते' असे फातिमा यांनी म्हटले आहे. प्रज्ञा यांनी याऐवजी विकासाच्या मुद्द्यावर प्रचार केला पाहिजे होता, असेही फातिमा यांनी यावेळी सुनावले आहे. फातिमा या मध्य प्रदेशचे माजी मंत्री मरहूम रसूल अहमद सिद्दीकी यांच्या कन्या आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाने भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी दिली आहे. मात्र फातिमा यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे. 

फातिमा रसूल सिद्दीकी या भोपाळमधील भाजपा नेत्या असून विधानसभा निवडणुकीत भाजपाने त्यांना भोपाळ उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, त्या निवडणुकीत काँग्रेसच्या आरिफ अकील यांनी फातिमा यांचा पराभव केला होता. 'साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या विधानांमुळे शिवराजसिंह चौहान यांची प्रतिमा मलीन झाली आहे. शिवराजसिंह यांचा मुस्लिमांशी चांगला संपर्क होता. शिवराजसिंह हे धर्मनिरपेक्ष विचारांचे आहेत' असंही फातिमा यांनी म्हटलं आहे. 

दिग्विजय सिंह 'दहशतवादी', साध्वी प्रज्ञा सिंहांचे पुन्हा वादग्रस्त विधानमध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. येथील काँग्रेस उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना दहशतवादी म्हटले आहे. पुन्हा एकदा दहशतवाद्याचा नायनाट करण्यासाठी एका संन्यासीनीला निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागले आहे, असे वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी  केले आहे.  सीहोर येथे निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करताना साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्या म्हणाल्या, " राज्यात 16 वर्षांपूर्वी उमा दिदी (उमा भारती) यांनी त्यांना पराभूत केले होते. त्यामुळे 16 वर्षापर्यंत ते डोकं वर काढू शकले नव्हते. त्यांना राजकारण ही करता आले नाही. आता पुन्हा त्यांनी डोकं वर काढले तर त्यांना पुन्हा एका संन्यासीनीसोबत सामना करावा लागत आहे. हे त्यांच्याच कर्माचंच फळ आहे." याआधी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणीही होत आहे. 

 

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूरBJPभाजपाMadhya Pradesh Lok Sabha Election 2019मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019