्रपोटच्या लेकीवर अत्याचार करणार्‍या पित्यास जन्मठेप

By Admin | Updated: July 15, 2015 23:38 IST2015-07-15T23:38:59+5:302015-07-15T23:38:59+5:30

नाशिक : स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या जन्मदात्या पित्यास जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला फलके जोशी यांनी जन्मठेपेसह दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे़ ३ एप्रिल २०१४ रोजी द्वारका परिसरातील वैद्यनगरमध्ये ही घटना घडली होती़

The father's life imprisonment was tortured by the plaintiff | ्रपोटच्या लेकीवर अत्याचार करणार्‍या पित्यास जन्मठेप

्रपोटच्या लेकीवर अत्याचार करणार्‍या पित्यास जन्मठेप

शिक : स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या जन्मदात्या पित्यास जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला फलके जोशी यांनी जन्मठेपेसह दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे़ ३ एप्रिल २०१४ रोजी द्वारका परिसरातील वैद्यनगरमध्ये ही घटना घडली होती़
याबाबत अधिक माहिती अशी की, आजीकडे राहणार्‍या पंधरा वर्षीय मुलीला तिचा पिता आरोपी इमरान शब्बीर गौरी (३८,रा़ द्वारका, नाशिक) याने वेळोवेळी कामास असलेल्या ठिकाणी बोलावून घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले़ या अत्याचाराचे अश्लील फोटो व व्हिडीओ चित्रीकरण करून सदर प्रकार कोणाला सांगितल्यास पत्नी व मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली़ या प्रकरणी पीडित मुलीने आपल्या आईसह भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता़
जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला फलके जोशी यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील सुप्रिया गोरे यांनी आठ साक्षीदार तपासले़ त्यानुसार दोषी ठरलेल्या इमरान शब्बीर शौरी यास जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली़(प्रतिनिधी)

Web Title: The father's life imprisonment was tortured by the plaintiff