त्याच्या उपवासाने वडिलांनी सोडला तंबाखू
By Admin | Updated: December 22, 2014 23:11 IST2014-12-22T23:11:57+5:302014-12-22T23:11:57+5:30
आर्मीत असलेल्या तरुणाने गाव सुधारण्याचा घेतला वसा

त्याच्या उपवासाने वडिलांनी सोडला तंबाखू
आ ्मीत असलेल्या तरुणाने गाव सुधारण्याचा घेतला वसाभोकर : गाव व्यसनमुक्त व्हावं़़़ जन्माला येणार्या चिमुकलीचंही स्वागत व्हावं़़़ गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप असावी़़़ यातूनच गावात उन्नती व्हावी़़़ यासाठी आर्मीमध्ये असलेला एक तरूण मागील चार वर्षांपासून धडपडतोय़ गाव व्यसनमुक्त व्हावे यासाठी त्याने चर दिवस पाण्यावर राहून उपवास केला़ मुलाची ही तळमळ पाहून वडिलांनी मात्र तंबाखू बंद करीत एक प्रकारे गावात व्यसनमुक्तीची सुरुवात केली़भोकर-मुदखेड रस्त्यावरील रिठ्ठा हे गाव़ गावातील बालाजी दिगांबर नागलवाड हा तरूण सध्या आर्मीत आहे़ सध्या तो काशी येथे कार्यरत आहे़ आपलं गाव सुंदर व्हावं, मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी तो धडपड करत आहे़ खेड्यातील चिमुकले इंग्रजीच्या जवळ जावे म्हणून त्याने गावात इंग्लीश स्कूल सुरू केली़ जोडीला वाचनालयही उभारले़ गावातील सामाजिक कामासाठी तो दरवर्षी वेतनामधून मिळालेले २० हजार रुपये खर्च करतो़ यातून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ज्यांनी दोन मुलींवर शस्त्रक्रिया केली अशा आई-वडिलांचा सत्कार, प्रबोधन अशी कामे करीत सामाजिक बांधिलकी जोपासत आहे़गाव व्यसनमुक्त व्हावे यासाठी त्यांनी रिठ्ठा गावालगत असलेल्या भवानी मंदिरात चार दिवस केवळ पाणी पिवून उपवास केला़ मुलाची ही तळमळ पाहून त्याचे वडील दिगांबर नागलवाड यांनी तंबाखू खाणे सोडून दिले़ खरं तर ही आता सुरुवात आहे व्यसनमुक्तीची़ यानंतर गावात परिवर्तनाचे वारे येतील अशी आशा बालाजी बाळगून आहे़