पित्याला जिवंत पेटविले
By Admin | Updated: January 14, 2017 00:06 IST2017-01-14T00:06:28+5:302017-01-14T00:06:28+5:30
नागपूर : आईशी काडीमोड घेण्याच्या तयारीत असलेल्या वडिलांसोबत भांडण करून तरुण मुलाने त्यांना पेटवून दिले. हुकडेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. यात राजेंद्र ऊर्फ राजू वसंतराव जिचकार (५६) भाजून गंभीर जखमी झाले आहेत.

पित्याला जिवंत पेटविले
न गपूर : आईशी काडीमोड घेण्याच्या तयारीत असलेल्या वडिलांसोबत भांडण करून तरुण मुलाने त्यांना पेटवून दिले. हुकडेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. यात राजेंद्र ऊर्फ राजू वसंतराव जिचकार (५६) भाजून गंभीर जखमी झाले आहेत.राजेंद्र यांचा मुलगा रॉकी ऊर्फ चंद्रशेखर नागपुरातील बेसा येथे राहतो. पत्नीसोबत पटत नसल्यामुळे राजेंद्र यांनी तिला घटस्फोटासाठी नोटीस पाठविली आहे. राजेंद्र बुधवारी त्यांच्या मुलाकडे नागपुरात आले होते. रात्री ९ वाजताच्या सुमारास घटस्फोटावरून पिता-पुत्रामध्ये वाद झाला. या वेळी संतप्त झालेल्या रॉकी व त्याचा मित्र नितीन वाघाडे यांनी राजेंद्र यांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिले. आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी धावली. त्यांनी राजेंद्र यांना रुग्णालयात केले. राजेंद्र यांच्या जबाबावरून रॉकी आणि नितीन यांच्याविरुद्ध जिवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. (प्रतिनिधी)---