पिता-पुत्रासह चौघेजण ठार
By admin | Updated: May 12, 2014 01:25 IST
मृत धरमलेवाडीचे : गाडी झाडावर आदळलीकोल्हापूर : लग्नाचा जथ्था काढून घरी परतणारी महिंद्रा जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात चारजण ठार झाले असून सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात ऐनीपैकी धरमलेवाडी (ता. राधानगरी) जवळ रात्री साडेनउच्या सुमारास घडला. मृतांमध्ये पांडुरंग दौलू धरमले (वय ४५), मारुती पांडुरंग धरमले (२१), ...
पिता-पुत्रासह चौघेजण ठार
मृत धरमलेवाडीचे : गाडी झाडावर आदळलीकोल्हापूर : लग्नाचा जथ्था काढून घरी परतणारी महिंद्रा जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात चारजण ठार झाले असून सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात ऐनीपैकी धरमलेवाडी (ता. राधानगरी) जवळ रात्री साडेनउच्या सुमारास घडला. मृतांमध्ये पांडुरंग दौलू धरमले (वय ४५), मारुती पांडुरंग धरमले (२१), रंगराव शंकर वरुटे (३२), अजित तुकाराम जाधव (३३ सर्व रा. धरमलेवाडी) यांचा समावेश आहे, तर शंकर बाळू कवडे, रवींद्र बाजीराव कवडे, बाजीराव लक्ष्मण कवडे, जयवंत पांडुरंग धरमले, अरुण पांडुरंग कवडे, साउबाई पाटील (रा. फराळे) हे गंभीर जखमी झाले आहेत.याबाबतची अधिक माहिती अशी, मारुती धरमले याच्या लग्नाचा जथ्था काढण्यासाठी हे सर्वजण महिंद्रा जीपमधून सरवडे येथे गेले होते. येथून परतत असताना ऐनीपैकी धरमलेवाडी येथे गाडी वळणावर उलटून झाडावर आदळली. या अपघातात पांडुरंग व मारुती हे पिता-पुत्र जागीच ठार झाले, तर अन्य दोघे रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत झाले होते. सर्व जखमींना सोळांकूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नंतर तेथून त्यांना कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये दाखल केले आहे. (प्रतिनिधी)