काँग्रेस खासदाराच्या पत्नीनं लिहिलेल्या फेसबुक पोस्टमुळे वादंग माजला आहे. केरळमधील काँग्रेस खासदार हिबी एडन यांच्या पत्नीची फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आहे. नशीब बलात्कारासारखं असतं. त्याला रोखू शकत नसाल, तर त्याचा आनंद घ्या, अशी पोस्ट हिबी एडन यांच्या पत्नी अन्ना यांनी लिहिली आहे. या पोस्टवरुन मोठा वाद झाल्यावर अन्ना यांनी पोस्ट डिलीट करुन माफी मागितली. मंगळवारी सकाळी अन्ना लिंडा एडन यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला. यासोबत त्यांनी पती हिबी ईडन यांचा फोटोदेखील शेअर केला. 'नशीब बलात्कारासारखं असतं. त्याला रोखू शकत नसाल, तर त्याचा आनंद घ्या,' असं शीर्षक त्यांनी फोटो आणि व्हिडीओला दिलं होतं. सध्या कोच्चीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोच्ची शहराचा बराचसा भाग पाण्याखाली आहे. अन्ना एडन यांची पोस्ट पावसाशी संबंधित असल्याचं अनेकांना वाटत आहे. एडन यांनी शेअर केलेला एक फोटो कोच्चीतील पूर परिस्थिती दाखवणारा आहे. एडन यांनी फोटो पोस्ट करून कोच्चीतील पुराचा खिल्ली उडवल्याचा आरोप होत आहे.
'नशीब बलात्कारासारखं असतं, त्याला रोखू शकत नसाल तर आनंद घ्या'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 16:11 IST