शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सायकलस्वाराला वाचवताना भीषण अपघात, ५३ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली नदीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 11:28 IST

Uttar Pradesh Accident News: उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर येथे सायकलस्वाराला वाचवण्याच्या नादात एका बसला भीषण अपघात झाला आहे. येथे ५३ प्रवाशांना घेऊन जाणारी बस पुलावरून उलटून शारदा नदीत कोसळली. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला असून, ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.  

उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर येथे सायकलस्वाराला वाचवण्याच्या नादात एका बसला भीषण अपघात झाला आहे. येथे ५३ प्रवाशांना घेऊन जाणारी बस पुलावरून उलटून शारदा नदीत कोसळली. या अपघातात ३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.  त्याशिवाय इतर काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातामधील जखमींना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच सायकलस्वाराला वाचवताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

हा अपघात  सिद्धार्थनगर येथीलल बढनी ब्लॉकजवळील मोहनकोला गावात झाला आहे. देवीपाटन मंदिरातून माघारी येत असताना चरगवां पूलाजवळ ही बस उलटली. या अपघातात ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. तर ३ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. बलरामपूर येथून येत असलेली ही बस एका सायकलस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चरगवां येथील नाल्यामध्ये कोसळली.  अपघातग्रस्त बसमधून एकूण ५३ प्रवासी प्रवास करत होते. सर्व प्रवासी बलरामपूर येथील देवी पाटण मंदिरामध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. तेथून परत असताना हा अपघात झाला.

अपघातग्रस्त बसमध्ये प्रवाशांची संख्या अधिक होती. त्यामुळे या अपघाताची तीव्रता अधिकच वाढली. जखमींना उपचारांसाठी बढनी येथील रुग्णालयात नेण्यात आले. तर इतरांना सीएससी सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातातील मृतांची ओळख पटली असून, त्यामध्ये मंगनीराम या सायकलस्वाराचाही समावेश आहे. याशिवाय अजय शर्मा आणि गामा यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघात