अबु जुंदालचे कारागृहात उपोषण

By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:48+5:302015-08-08T00:23:48+5:30

- २६/११ हल्ल्यातील आरोपी

Fasting in Abu Jundal Prison | अबु जुंदालचे कारागृहात उपोषण

अबु जुंदालचे कारागृहात उपोषण

-
६/११ हल्ल्यातील आरोपी
मुंबई : औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणासह २६/११ हल्ल्यात आरोपी असलेल्या अबू जुंदालने आर्थररोड कारागृहात बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. अटकेनंतर त्याला अजमल कसाब बंद होता त्या अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. तिथे तो एकटाच आहे.
एकांत खायला उठतो, त्यामुळे मला अन्य ठिकाणी ठेवा. हवा आणि सूर्यप्रकाश असेल अशा ठिकाणी ठेवा, या मागणीसाठी उपोषण सुरू केल्याचे पत्र त्याने ना. म. जोशी पोलीस ठाण्यात दिले आहे. या आधी त्याने न्यायालयाकडे ही मागणी केली होती. मात्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला होता, अशी माहिती मिळते. २६/११चा हल्ला करणार्‍या दहा अतिरेक्यांना जुंदालने प्रशिक्षण दिले होते.

Web Title: Fasting in Abu Jundal Prison