शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

FASTag चे दिवस जाणार! आता नव्या तंत्रज्ञानानं टोल वसुली करणार सरकार, रिचार्जची गरजच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 15:06 IST

टोल वसुलीसाठी सरकार नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. जर याची अंमलबजावणी झाली, तर FASTag तंत्रज्ञानाचीही गरज पडणार नाही.

नवी दिल्ली-

टोल वसुलीसाठी सरकार नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. जर याची अंमलबजावणी झाली, तर FASTag तंत्रज्ञानाचीही गरज पडणार नाही. केंद्र सरकार जीपीएस सॅटेलाइट तंत्रज्ञानाच्या मदतीनं टोल टॅक्स वसूल करण्याच्या तयारीत आहे. सध्या हे सर्व काम वाहनाच्या काचेवर लावलेल्या FASTag द्वारे केलं जातं. FASTag रिचार्ज करणं आवश्यक आहे आणि वाहन टोल प्लाझातून जाताच, प्लाझावरील RFID वाचक FASTag मधून पैसे कापतात. यामध्ये चालकाला काही करण्याची गरज नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅटेलाइट आधारित टोल वसुली सिस्टमची तपासणी सध्या पायलट प्रोजेक्टमध्ये सुरू आहे.

नव्या तंत्रज्ञानामध्ये जीपीएस सॅटेलाइट तंत्रज्ञानाच्या आधारे टोल टॅक्स वसूल केला जाणार आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे तुम्ही जितकं अंतर कापता तितकाच टोल टॅक्स तुमच्याकडून आकारला जाईल. महामार्गावरील अंतरासाठी टोल घेतला जाईल. या वर्षी मार्चमध्ये रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितले होतं की सरकार पुढील एका वर्षात देशभरातील सर्व टोल प्लाझा बूथ हटवेल. या दिशेनं काम वेगानं सुरू आहे.

सरकारचं म्हणणं काय?टोल बुथच्या जागी जीपीएस आधारित टोल वसुली यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची माहितीही नितीन गडकरी यांनी दिली. जीपीएस इमेजिंगच्या मदतीनं महामार्ग किंवा एक्स्प्रेस वेवर चालणाऱ्या वाहनांकडून टोल टॅक्स वसूल केला जाईल. जीपीएस आधारित टोल टॅक्स वसुलीचे तंत्रज्ञान सध्या अनेक युरोपीय देशांमध्ये आधीच लागू करण्यात आलं आहे आणि त्यास मिळालेलं यश पाहता भारतातही लागू केली जाणार आहे. सध्याच्या नियमात टोल टॅक्सच्या मोजणीसाठी महामार्गाचे अंतर म्हणजेच एका पट्ट्याचे अंतर ग्राह्य धरलं जाते. हे सहसा ६० किमी असतं आणि जर ते कमी किंवा जास्त असेल तर त्यानुसार कर देखील बदलला जातो. परंतु ६० किमी मानक मानलं जातं. त्याच रस्त्यावर एखादा पूल, कल्व्हर्ट किंवा ओव्हरब्रिज पडला तर त्याचा टोल बदलतो.

नव्या तंत्रज्ञानात काय?नवीन तंत्रज्ञानामध्ये तुमची कार किती अंतर कापेल या आधारावर टोलचे पैसे कापले जातील. त्यासाठी दोन तंत्रज्ञानावर काम सुरू आहे. पहिल्या तंत्रज्ञानामध्ये, वाहनात जीपीएस ट्रॅकिंग तंत्रज्ञान असेल, ज्यामुळे महामार्गावरील सॅटेलाइटद्वारे वाहन मालकाच्या बँक खात्यातून थेट टोलचे पैसे कापले जातील. दुसरं तंत्र म्हणजे नंबर प्लेटद्वारे टोल वसुली.

नंबर प्लेटवर टोलसाठी संगणकीकृत प्रणाली असेल जी सॉफ्टवेअरच्या मदतीने टोल वसूल करण्यास मदत करेल. या तंत्रात महामार्गावर वाहन कोणत्या पॉइंटवरून प्रवेश करेल, त्याची माहिती नोंदवली जाईल. यानंतर महामार्गावरून गाडी ज्या पॉईंटवर जाईल, तेथेही त्याची नोंदणी केली जाईल. या दरम्यान, महामार्गावर वाहन किती किलोमीटर चालले असेल त्यानुसार वाहन मालकाच्या बँक खात्यातून टोलचे पैसे कापले जातील.

टॅग्स :Fastagफास्टॅगtollplazaटोलनाका