शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत असताना भेटले नाहीत, मृत्यूनंतर संपत्तीसाठी अंगठ्याचा ठसा घ्यायला आले नातेवाईक अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 18:40 IST

एका वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. हे महिलेच्या पुतण्यांना कळताच त्यांनी ताबडतोब रुग्णालयात पोहोचून संपत्तीसाठी महिलेच्या अंगठ्याचे ठसे घेण्याचा प्रयत्न सुरू केला.

उत्तर प्रदेशच्या फरुखाबाद जिल्ह्यातील फतेहगड भागात राहणाऱ्या एका वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. हे महिलेच्या पुतण्यांना कळताच त्यांनी ताबडतोब रुग्णालयात पोहोचून संपत्तीसाठी महिलेच्या अंगठ्याचे ठसे घेण्याचा प्रयत्न सुरू केला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ते संशयास्पद वाटलं आणि त्यांनी ताबडतोब पोलिसांना याची माहिती दिली. परिस्थिती बिघडत चालली आहे हे पाहून पुतण्यांनी हा प्रयत्न सोडून दिला आणि शवविच्छेदनानंतर मृतदेह घरी नेण्यासाठी घाई केली.

मुन्नी देवी असं ६० वर्षीय महिलेचं नाव आहे, त्यांच्या पतीचं आधीच निधन झालं होतं. तसेच त्यांना मूलबाळ नव्हतं. पतीच्या निधनानंतर शेजारी राहणाऱ्या राकेश पाल याने मुन्नी देवी यांची काळजी घेण्यास सुरुवात केली. मुन्नी देवीही त्याला आपल्या मुलासारखं मानत असे. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांची संपत्ती राकेशच्या नावावर केली. मृत्युपत्रात तसं नमूद केलं होतं.

गेल्या महिन्यात मुन्नी देवी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मंगळवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुन्नी देवीच्या मृत्यूची बातमी मिळताच, तिचे पुतणे प्रेमपाल सिंह आणि धर्मवीर सिंह रुग्णालयात पोहोचले आणि त्यांच्या अंगठ्याचे ठसे घेण्याचा प्रयत्न करू लागले. वॉर्डमधील कर्मचाऱ्यांना याचा संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळवलं.

जेव्हा पुतण्यांनी मृतदेह त्यांच्यासोबत घरी नेण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा राकेश पाल यांनी त्याला विरोध केला. जेव्हा मुन्नी देवी आजारी होत्या तेव्हा कोणीही त्यांची काळजी घेण्यासाठी आलं नव्हतं. जिवंतपणी कोणीही त्यांना भेटायला आलं नाही. परंतु आता संपत्ती दिसल्यावर नातेवाईक आल्याचं राकेश यांनी म्हटलं आहे. राकेश आणि पुतणे या दोघांमध्ये याच्यावरून वाद सुरू झाला. परंतु अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मृतदेह पुतण्यांच्या ताब्यात देण्यात आला.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशhospitalहॉस्पिटल