शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 21:46 IST

Farooq Abdullah On America Entry in Israel Iran War: ट्रम्प हे नेमका काय खेळ खेळत आहेत, ते माहिती नाही. तिसऱ्या महायुद्धाकडे या सगळ्या गोष्टी जात आहेत, असे फारूक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

Farooq Abdullah On America Entry in Israel Iran War: इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धात अखेर अमेरिकेने उडी घेतली. अमेरिकेने इराणमधील तीन अणु प्रकल्पांवर हल्ले केले. यानंतर आता जगभरात प्रतिक्रिया उमटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरात लवकर शांतता निर्माण होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तसेच इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चाही केली. यातच या युद्धात रशिया उडी घेऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी केलेले एक विधान चर्चेत आले आहे. 

मीडियाशी बोलताना फारूक अब्दुल्ला म्हणाले की, तेथील मुस्लिम देश शांतपणे तमाशा पाहत आहेत, याचे मला वाईट वाटते. आज त्यांची ही अवस्था आहे, उद्या इतरांचीही अशीच अवस्था होईल, मी तुम्हाला सांगतो की, आज जे गप्प बसले आहेत, त्यांनाही अमेरिका नष्ट करण्याचा प्रयत्न करेल, असा दावा फारूक अब्दुल्ला यांनी केला. त्यांच्यावरही आज ना उद्या अशी वेळ येईल, आज जर जागे झाले नाहीत, तर त्यांच्यावर वेळ येण्याची त्यांनी वाट पाहावी, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. तिसऱ्या महायुद्धाकडे या सगळ्या गोष्टी जात आहेत

इराण आणि इस्रायल युद्धात ट्रम्प यात हस्तक्षेप करतील, असे वाटले होते. परंतु, तेच आता या युद्धात उतरले आहेत. आधीच अमेरिका रशिया-युक्रेन युद्धात लढत आहे. आता त्यांनी दुसरे युद्ध सुरू केले आहे. याचाच अर्थ हळूहळू तिसऱ्या महायुद्धाकडे या सगळ्या गोष्टी जात आहेत, असा दावाही अब्दुल्ला यांनी केला. सर्वाधिक कच्चे तेल तेथूनच आपल्याला मिळते. या युद्धामुळे त्यावरही तीव्र परिणाम होईल. आपल्या अर्थव्यवस्थेवरही याचे परिणाम पाहायला मिळतील, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ट्रम्प यांनी अलीकडेच पाकच्या फिल्ड मार्शल यांना भोजनासाठी निमंत्रित केले होते. ट्रम्प हे नेमका काय खेळ खेळत आहेत, ते माहिती नाही. एकीकडे हिंदुस्थानलाही हाताशी धरले आहे आणि दुसऱ्या बाजूला पाकलाही हाताशी धरले आहे. त्यांना नेमके काय करायचे आहे, याचा काही अंदाज नाही, असे अब्दुल्ला यांनी नमूद केले. 

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाAmericaअमेरिकाIsraelइस्रायलIranइराण