शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

फारुख अब्दुल्ला यांची अखेर नजरकैदेतून सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 14:37 IST

१५ सप्टेंबरपासून नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

ठळक मुद्देसध्या ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, शाह फैसल यांच्यासह अनेक नेते ताब्यात आहेत. जम्मू - काश्मीर सरकारने नजरकैदेतून सुटका करण्याचा आदेश शुक्रवारी जारी केला.

जम्मू - काश्मीर - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारूक अब्दुल्ला यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली आहे. सहा महिन्यांपासून अब्दुल्ला नजरकैदेत होते. जम्मू - काश्मीर सरकारने नजरकैदेतून सुटका करण्याचा आदेश शुक्रवारी जारी केला. कलम ३७०  हटविल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी फारूक अब्दुल्ला यांना घरातून अटक करण्यात आली. यानंतर, १५ सप्टेंबरपासून नजरकैदेत ठेवण्यात आले होते. तब्बल सहा महिन्यांनी त्यांना नजरकैदेतून सोडण्यात आले.जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णंय केंद्र सरकारने घेतल्यानंतर जनसुरक्षा कायद्यान्वये (पीएसए) तत्काळ प्रभावाने माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांच्यासह, त्यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि पिपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या (पीडीपी) प्रमुख आणि माजी मुख्यंमत्री मेहबुबा मुफ्ती या तिघांना सरकारने त्यांच्या राहत्या घरी नजरकैदेत ठेवले होते.

ईव्हीएम ‘चोर’ मशीन आहे - फारूक अब्दुल्ला

 

प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्येतच का हवं? फारूक अब्दुलांचा सवाल

 

अमरनाथ यात्रेचे हल्लेखोर काश्मीरीही नाहीत आणि मुसलमानही नाही: फारूक अब्दुल्ला

 

फारुख अब्दुल्लाला यांना ५ ऑगस्टपासून नजरकैदेत ठेवण्यात आले होते, परंतु सरकारने गेल्या वर्षी १५ सप्टेंबर रोजी त्यांच्यावर सार्वजनिक सुरक्षा कायदयान्वये (पीएसए) गुन्हा दाखल केला होता. यानंतर त्याला तीन महिन्यांसाठी नजरकैदेत ठेवण्यात आले. तीन महिन्यांचा मुदत १५r डिसेंबर रोजी संपणार होता, त्यापूर्वी दोन दिवस म्हणजेच १३ डिसेंबर रोजी त्यांची नजरकैद 3 महिन्यांसाठी वाढविण्यात आली. आता त्याची नजरकैद संपविण्याचा जम्मू - काश्मीर सरकारने निर्णय घेण्यात आला आहे.ओमर आणि मेहबुबा अद्याप ताब्यातफारुख अब्दुल्ला यांच्या व्यतिरिक्त त्यांचा मुलगा आणि माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्याशिवाय मेहबुबा मुफ्ती, आयएएस अधिकारी-राजकीय-राजकीय नेते शाह फैसल यांच्याविरोधात पीएसए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर सर्व नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. सध्या ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, शाह फैसल यांच्यासह अनेक नेते ताब्यात आहेत.

 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरChief Ministerमुख्यमंत्रीFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाGovernmentसरकार