शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Farmer Protest : आंदोलनाला होणार चार महिने पूर्ण; शेतकरी नेत्यांची २६ मार्चला 'भारत बंद'ची हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 21:30 IST

Farmer Protest : १०० दिवसांपेक्षा अधिक दिवसांपासून सुरू आहे शेतकऱ्यांचं आंदोलन

ठळक मुद्दे१०० दिवसांपेक्षा अधिक दिवसांपासून सुरू आहे शेतकऱ्यांचं आंदोलन'टिकैत पश्चिम बंगाललाही जाणार, शेतकऱ्यांची घेणार भेट

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होऊन १० दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. सरकार आणि संघटनांच्या नेत्यांमध्ये आतापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या असून त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. शेतकरी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याच्या आणि एमएसपीवर कायदा करण्याच्या आपल्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान २६ मार्च रोजी शेतकरी आंदोलनाला चार महिने पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेत्यांनी भारत बंदची हाक दिली आहे.यापूर्वी शेतकऱ्यांनी २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅली काढली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. यानंतर पोलिसांनी कारवाई करत अनेकांना अटक केला होती. तसंच निरनिराळ्या व्यक्तींविरोधात ३८ गुन्हे दाखल करण्यात आली होती. दरम्यान, दुसरीकडे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी आगामी १३ मार्च रोजी कोलकात्यात जाण्याची घोषणा केली आहे. तसंच पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी शेतकऱ्यांशी चर्चा करणार असल्याचंही म्हटलं आहे. परंतु आपण कोणत्याही पक्षाचं समर्थन करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. १३ मार्च रोजी आपण कोलकात्याला जाणार असून तेथूनच निर्णायक संघर्षाचं बिगुल फुंकणार असल्याचं टिकैत म्हणाले. भाजपच्या धोरणांमुळे देशातील शेतकरी त्रस्त आहेत. पश्चिम बंगालमध्ये आपण शेतकऱ्यांची चर्चा करणार आहोत. तसंच भाजपला पराभूत करण्याचं आवाहनही करणार आहोत. याव्यतिरिक्त कोणत्याही पक्षाला समर्थन बिलकुल देणार नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. मतं मागण्यास जात नाहीआपण पश्चिम बंगालमध्ये मतं मागण्यास जात नाही. तसंच त्या ठिकाणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेण्याचा कोणताही कार्यक्रम ठरला नसल्याचंही टिकैत यांनी सांगितलं. यानंतर टिकैत यांनी महापंचायतीला संबोधित केलं आणि मोदी सरकारवर हल्लाबोलही केला. गेल्या काही महिन्यांमध्ये सरकार आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये अनेकदा चर्चा झाली आहे. परंतु त्यातून कोणताही मार्ग निघालेला नाही. सरकारनं हे कायदे दीड वर्षांपर्यंत पुढे ढकलण्याची तसंच यात सुधारणा करण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु शेतकरी संघटना हे कायदे रद्द करण्यासाठी तसंच एमएसपीवर कायदा तयार करण्यावर ठाम आहेत.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनBharat Bandhभारत बंदrakesh tikaitराकेश टिकैतwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा