शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Kisan Kranti Padyatra: सरकारची आश्वासनं नामंजूर; शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 18:33 IST

आज रात्रभर शेतकरी दिल्लीच्या सीमेवरच थांबणार

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीच्या सीमेवर पोहोचलेल्या किसान क्रांती पदयात्रेनं उग्र रुप धारण केलं आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं यासाठी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप या प्रयत्नांना यश आलेलं नाही. दिल्ली-उत्तर प्रदेशच्या सीमेवर केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी बातचीत केली. मात्र यातून कोणताही मार्ग निघालेला नाही. सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल, असं आश्वासन राजनाथ सिंह यांनी शेतकऱ्यांना दिलं. मात्र यावरुन शेतकऱ्यांचं समाधान झालेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच राहणार आहे. आज रात्रभर हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर थांबणार आहेत. सरकारनं दिलेलं आश्वासन शेतकऱ्यांना मंजूर नाही. त्यामुळे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही, असं शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी म्हटलं आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस बळाचा वापर करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमार केला. याशिवाय अश्रूधुराच्या नळकांड्यादेखील फोडल्या. यावरुन काँग्रेससह सर्वच विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. शेतकऱ्यांचा एक गट हिंसक झाल्यानं काही पोलीस जखमी झाले. त्यामुळे सौम्य लाठीमार करण्यात आल्याचं स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आलं. उग्र होत असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन रोखण्यासाठी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र शेखावत आणि उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री सुरेश राणा यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. मात्र यातून अद्याप मार्ग निघालेला नाही. शेतकऱ्यांच्या मागण्यांबद्दल सरकार सकारात्मक असून याबद्दल विचार केला जाईल, असं आश्वासन शेखावत आणि राणा यांनी सरकारच्या वतीनं शेतकऱ्यांना दिलं. मात्र यानंतरही शेतकऱ्यांचं समाधान झालेलं नाही. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच राहील, असं भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी सांगितलं. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीFarmerशेतकरी