शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार, केला अश्रुधुराच्या गोळ्यांचा मारा

By बाळकृष्ण परब | Updated: January 3, 2021 20:44 IST

Farmer Protest News : आंदोलनकर्ते शेतकरी आणि आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर ही वादावादी एवढी वाढली की, जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. एवढेच नाहीतर त्यांना रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनी अश्रुधुराचे गोळेही डागले.

ठळक मुद्देशाहजहांपूर हरियाणा बॉर्डर येथून हरियाणामध्ये प्रवेश करणारे शेतकरी आणि आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद महामार्गावर .शेतकरी आणि आणि पोलिसांमध्ये झालेल्या वादानंतर रस्त्यावर वाहनांच्या सुमारे पाच किलोमीटर लांब रांगा लागल्याहे सर्व शेतकरी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निघाले होते

चंदिगड - केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन सुमारे एक महिन्यानंतरही सुरू आहे. दरम्यान, रविवारी अलवर जिल्ह्यातील शाहजहांपूर हरियाणा बॉर्डर येथून हरियाणामध्ये प्रवेश करणारे शेतकरी आणि आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर ही वादावादी एवढी वाढली की, जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. एवढेच नाहीतर त्यांना रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनी अश्रुधुराचे गोळेही डागले.महामार्गावर .शेतकरी आणि आणि पोलिसांमध्ये झालेल्या वादानंतर रस्त्यावर वाहनांच्या सुमारे पाच किलोमीटर लांब रांगा लागल्या. दरम्यान, सर्व आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना हरियाणामधील धारुहेडाजवळ रोखण्यात आले आहे. हे सर्व शेतकरी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निघाले होते. ते हरियाणामधून दिल्लीकडे जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र हरियाणा पोलिसांनी त्यांना वाटेत रोखले.यापूर्वी गुरुवारी राजस्थानमधून शेतकऱ्यांचा एक गट राजस्थान-हरियाणा सीमावरील शाहजहाँपूरमध्ये जबरदस्तीने घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. सुमारे एक डझन ट्रॅक्टर बॅरिकेटिंग तोडून हरियाणामध्ये प्रवेश करत होते आणि दिल्लीकडे रवाना झाले होते.शेतकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या वादावादीदरम्यान, शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे डागले. तसेच पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा केला. मात्र आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर या कारवाईचा काहीही परिणाम झाला नाही.

टॅग्स :FarmerशेतकरीHaryanaहरयाणाPoliceपोलिस