शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

गरमीपासून बचावासाठी आंदोलनस्थळी शेतकऱ्यांकडून पक्क्या घरांची बांधणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 8:00 PM

Farmers Protest : गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचं कृषी कायद्यांविरोधात सुरू आहे आंदोलन

ठळक मुद्देगेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचं कृषी कायद्यांविरोधात सुरू आहे आंदोलनमहिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एसीही लावण्याची व्यवस्था होणार

गेल्या अनेक दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता १०० दिवसही पूर्ण होऊन गेले आहेत. दरम्यान, आतापर्यंत शेतकरी आणि सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. परंतु अद्यापही त्यावर तोडगा निघालेला नाही. सध्याही हरयाणा आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. मार्च महिन्यात दिल्लीत तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशातच गरमीपासून आपलं रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळीच घरांची उभारणी सुरू केली आहे. याशिवाय या घरांमध्ये कुलर किंवा एसी लावण्याबाबतही विचार केला जात आहे."शेतकऱ्यांनी गरमीपासून बचावासाठी आंदोलनस्थळी घरांची बांधणी करण्यास सुरूवात केली आहे. आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि महिलांसाठी या घरांमध्ये एसीदेखील लावणार आहोत. स्थानिक एसएचओ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावाखाली येऊल काल कुंडली येथे घरांची उभारणी थांबवण्याचे प्रयत्न केले होते," अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते मंजित सिंग राय यांनी एएनआयशी बोलताना दिली. "ही घरं शेतकऱ्यांच्या इच्छाशक्तीप्रमाणेच मजबूत आणि कायम असणारी आहेत. आतापर्यंत २५ घरांची उभारणी करण्यात आली आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये १ हजार ते २ हजार घरांची उभारणी केली जाईल," अशी माहिती किसान सोशल आर्मीचे अनिल मलिक यांनी दिली. टिकरी सीमेवर ज्या घरांची उभारणी करण्यात आली आहे. ते सामान्य खोलीप्रमाणेच आहेत. यामध्ये कुलर, पंखे यांच्यासोबत खिडक्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच या घरांच्या वरील बाजूला गवत घालून गरमीपासून रक्षण केलं जात आहे. २६ मार्चला भारत बंदची हाक२६ मार्च रोजी शेतकरी आंदोलनाला चार महिने पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेत्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅली काढली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. यानंतर पोलिसांनी कारवाई करत अनेकांना अटक केला होती. तसंच निरनिराळ्या व्यक्तींविरोधात ३८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीFarmerशेतकरीBorderसीमारेषा