शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘पुसा डी-कंपोजर’ विकणाऱ्या कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 03:23 IST

Farmers Loot News: संडे अँकर। सरकारला २० रुपयांत, तर शेतकऱ्यांना १०० रुपयांत चार कॅप्सूल

विकास झाडे 

नवी दिल्ली : शेतातील तण नष्ट करून प्रदूषण थोपविणे आणि तणाचे खतामध्ये रूपांतर करून जमिनीची पोत वाढविणाºया ‘पुसा डी-कंपोजर’ विक्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या कंपन्यांना ‘पुसा डी-कंपोजर’ तयार करून विकण्याचे अधिकार दिले आहेत ते शेतकऱ्यांकडून पाच पटीने जास्त पैसे वसूल करीत असल्याचे उघडकीस आले आहे.

‘लोकमत’ने शुक्रवारी ‘पुसा डी-कंपोजर’बाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर काही शेतकऱ्यांनी वितरकांकडून या कॅप्सूल मागविल्या. भारतीय कृषी संशोधन संस्थेतील (पुसा) सूक्ष्म जीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. के. अन्नपूर्णा यांनी चार कॅप्सूल २० रुपयांमध्ये उपलब्ध होतील, अशी माहिती दिली होती. पुसातर्फे दिल्लीतून हरयाणा, पंजाब आणि दिल्ली सरकारला २० रुपयांमध्येत कॅप्सूल पुरविल्या जात आहेत. शिवाय शेतकºयांनाही याच किमतीमध्ये ‘पुसा डी-कंपोजर’ विकले गेले आहे.

‘पुसा डी-कंपोजर’चे संशोधन भारतीय कृषी संशोधन संस्थेत झाले आहे; परंतु देशभरातील शेतकºयांपर्यंत वितरणाची यंत्रणा संस्थेकडे नसल्याने या तंत्रज्ञानाचा करार सहा खासगी कंपन्यांशी करण्यात आला आहे. मात्र, या कंपन्यांकडून चार कॅप्सूलसाठी पुसाप्रमाणे २० रुपये न आकारता १०० रुपये वसूल करीत आहे. शिवाय पोस्टेज खर्च स्वतंत्र द्यावा लागत आहे. बायोकोल या कंपनीने एका शेतकºयांकडून १६ कॅप्सूलसाठी ५०० रुपये आकारणी केली. याच कॅप्सूल पुसाच्या मुख्यालयातून घेतल्या असत्या, तर केवळ ८० रुपये द्यावे लागले असते. बायोकोल कंपनीचे विक्री प्रतिनिधी नरेंद्र सिंग यांना यासंदर्भात विचारणा केली, तर त्यांनी कॅप्सूलचा निर्मिती खर्च अधिक येतो. त्यामुळे हा दर आकारत आहोत. स्वस्त पाहिजे असेल, तर पुसाच्या मुख्यालयातून घ्याव्यात, असा सल्लाही त्यांनी दिला.शंभर रुपयेही वाजवीच -डॉ. के. अन्नपूर्णायासंदर्भात सूक्ष्म जीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. के. अन्नपूर्णा यांच्याशी चर्चा केली असता त्या कंपन्यांची बाजू घेत म्हणाल्या, ज्या कंपन्यांशी करार केला आहे, त्यांना १०० रुपयांत चार कॅप्सूल विकण्याची मुभा देण्यात आली आहे. कॅप्सूल निर्मितीचा खर्च, मनुष्यबळ आणि जीएसटीचा विचार करता शंभर रुपये वाजवी आहे. येणाºया काळात पुसा ही किंमत वाढविण्याच्या विचाराधीन आहे.कंपन्यांवर सरकारचे नियंत्रण नाहीकोविड-१९ च्या काळात शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत असताना त्यांच्याकडून औषधांच्या नावावर लूट सुरू आहे. या यंत्रणेत कंपनीसह कोण-कोण मालामाल होणार आहेत, तेही तपासणे गरजेचे आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी