शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Farmers Protests : कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलनातील आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 15:44 IST

Farmers Protests Punjab Farmer Dies : दिल्ली-हरियाणाच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये पंजाबच्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घ्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. कायदे रद्दच करा, ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय येथून हलणार नाही, असा इशारा देत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. कडाक्याच्या थंडीत गेल्या 22 दिवसांपासून केंद्राच्या कृषी कायद्यांचा विरोध करत शेतकरी आंदोलन करत आहेत. याच दरम्यान गुरुवारी पहाटे शेतकरी आंदोलनातील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-हरियाणाच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये पंजाबच्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. पंजाबच्या या 37 वर्षीय शेतकऱ्याला 10, 12 आणि 14 वर्षांची तीन मुलं आहेत. शेतकऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, नोव्हेंबरमध्ये सुरू झालेल्या या आंदोलनादरम्यान आत्तापर्यंत जवळपास 20 आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या काही दिवसांत दिल्ली आणि आजूबाजूच्या भागात तापमान कमी आहे. पहाटेच्या सुमारास जवळपास पाच डिग्रीपर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दिवसाही तापमान 4 डिग्रीपर्यंत नोंदवण्यात येतं. कडाक्याच्या थंडीतही आपला जीव धोक्यात घालूनही शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  सिंघू बॉर्डरवर शकील मोहम्मद कुरेशी कडाक्याच्या थंडीत बसलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति असलेला आदर व्यक्त करत आहेत.  

कडक सॅल्यूट! सिंघू बॉर्डरवर कडाक्याच्या थंडीत बसलेल्या शेतकऱ्यांना 'ही' व्यक्ती वाटते मोफत स्वेटर

शकील मोहम्मद कुरेशी शेतकऱ्यांना मोफत स्वेटर वाटत आहेत. दररोज सकाळी आठ वाजता कुरेशी रस्त्याच्या कडेला आपला स्टॉल लावतात आणि स्थानिक ठिकाणी तयार केलेले स्वेटर नव्या केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली-हरयाणा सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना ते मोफत वाटत आहेत. कुरेशी यांनी शेतकऱ्यांना आतापर्यंत 300 जॅकेट्स आणि स्वेटरचं वाटप केलं आहे. कुरेशी हे गरम कपडे विकण्याचे काम करतात. ते दररोज 2500 रुपयांची कमाई करतात. 

कुरेशी यांचे वडील हे उत्तर प्रदेशातील बागपत येथील शेतकरी आहेत. "माझे वडील एक शेतकरी आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य किती कठीण असते हे मला माहीत आहे. शेतकरी आपल्या पिकाला उचित किंमत मिळावी यापेक्षा अधिक काहीच मागत नाहीत" असं कुरेशी यांनी म्हटलं आहे. ते आपली पत्नी आणि मुलांसह उत्तर दिल्लीतील नरेला येथे राहतात. कुरेशी यांनी गरम कपड्यांच्या किंमतीविषयी काही बोलायला नकार दिला. हे चांगल्या कामासाठी माझं योगदान आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपDeathमृत्यूdelhiदिल्ली