शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Farmers Protest :  आम्ही कृषी कायदे अत्यंत विचारपूर्वक तयार केलेत - कृषीमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 16:05 IST

Farmers Protest : कृषी कायद्यात सुधारणा करण्याचा सरकारचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर आता शेतकऱ्यांनी देशभरात तीव्र आंदोलन आणि रेल्वे ट्रॅक जाम करण्याचा इशारा दिला आहे.

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन गेल्या 16 दिवसांपासून सुरू आहे. आतापर्यंत सरकार आणि शेतकरी यांच्यात झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा निघालेला नाही. कृषी कायद्यात सुधारणा करण्याचा सरकारचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर आता शेतकऱ्यांनी देशभरात तीव्र आंदोलन आणि रेल्वे ट्रॅक जाम करण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी विरोधकांवर निशाणा साधत शेतकऱ्यांनी कुणाच्याही सांगण्यावर विश्वास ठेवू नये, असा सल्ला दिला आहे. तसेच, सरकार अद्याप चर्चेसाठी तयार आहे. आम्ही प्रत्येक समस्येचा विचार करीत आहोत, असे नरेंद्रसिंह तोमर म्हणाले.

'कृषी कायदे अत्यंत विचारपूर्वक'कृषीमंत्री म्हणाले, "भारत सरकारने अत्यंत विचारपूर्वक कृषी कायदे केले आहेत. शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी तयार केले आहेत. वर्षानुवर्षे शेतकर्‍यांवर होत असलेले अन्याय दूर करण्यासाठी तयार केले आहेत. तरीही सरकार शेतकरी संघटनांशी चर्चा करून कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास तयार आहे."

याचबरोबर, शेतकरी आंदोलनादरम्यान संघटनांशी सहा चर्चेच्या फेऱ्या झाल्या. सरकारची सतत विनंती अशी होती की, कायद्याच्या कोणत्या तरतुदी आहेत, ज्यावर शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. अनेक चर्चेवेळी शक्य हे झाले नाही. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे द्यावे. सरकारने शेतकऱ्यांना प्रस्ताव पाठविला आहे. कोणत्याही कायद्याच्या तरतुदींवर आक्षेप असल्यास त्याबाबत चर्चा झाली आहे आणि पुढेही करता येईल. आमचा प्रस्ताव त्यांच्याकडे (शेतकरी) आहे. त्यांनी त्याविषयी चर्चा केली, पण आम्हाला त्यांच्याकडून काहीच उत्तर मिळाले नाही, असे नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले.

आता शेतकऱ्यांचा काय प्लॅन?आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून हे तीनही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. आता आंदोलन मोठ्या पातळीवर नेण्याचा शेतकरी निर्धार करीत आहेत. आता 12 डिसेंबरपासून शेतकरी देशभर टोल नाके फ्री करण्याची तयारी करत आहेत. तर 14 डिसेंबर रोजी देशभरातील भाजपा नेत्यांना घेराव करून जिल्हा मुख्यालयात निदर्शने करण्याची योजना आहे. एवढेच नव्हे तर सरकारवर दबाव वाढवण्यासाठी शेतकरी संघटनांनी 12 डिसेंबरपासून दिल्लीचा वेढा वाढवण्याचा इशाराही दिला आहे.  

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपBJPभाजपाFarmerशेतकरी