सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने केलेले कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीवर स्थगिती आणली असून त्यावर शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्य़ासाठी समिती नेमण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरही केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेची आज ९वी फेरी पार पडली. या बैठकीत काहीतरी तोडगा निघेल अशी अपेक्षा सरकारला होती. परंतु चर्चेच्या नवव्या फेरीतदेखील कोणताही तोडगा निघालेला नाही. आता १९ जानेवारी रोजी सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेची दहावी फेरी होणार आहे. आजच्या चर्चेदरम्यान जेवणापूर्वी सरकारनं हरयाणातील करनाल येथे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या सभेत झालेल्या तोडफोडीचा मुद्दा मांडला. तर दुसरीकडे शेतकरी नेत्यांनीदेखील पंजाबमध्ये ट्रान्सपोटर्सकडे टाकण्यात आलेल्या एनआयएच्या छाप्याचा विरोध केला. "या प्रकरणाचा चर्चेतूनच मार्ग काढला जावा अशी दोन्ही पक्षांची बैठकीदरम्यान सहमती झाली. १० जानेवारी रोजी चर्चेची दहावी फेरी पार पडणार आहे. आजच्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या समितीबाबत कोणतीही चर्चा करण्यात आली नाही," अशी माहिती बैठकीनंतर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांनी माध्यमांना दिली.
आंदोलक शेतकऱ्यांसोबत चर्चेची नववी फेरीही निष्फळ, १९ तारखेला पुन्हा बैठक
By जयदीप दाभोळकर | Updated: January 15, 2021 19:01 IST
समितीकडून विचारणा झाल्यानंतर सरकार बाजू मांडणार, तोमर यांची महिती
आंदोलक शेतकऱ्यांसोबत चर्चेची नववी फेरीही निष्फळ, १९ तारखेला पुन्हा बैठक
ठळक मुद्देशेतकरी नेते, सरकारमधील चर्चेची नववी बैठकही निष्फळ१९ जानेवारी रोजी चर्चेची दहावी फेरी