शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

Farmer's Protest: निहंग प्रमुखांसोबत केंद्रीय कृषिमंत्री Narendra Singh Tomar यांच्या फोटोमुळे खळबळ, सरकारवर झाले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 08:33 IST

Farmer's Protest Update: मंगळवारी निहंग समुहाचे प्रमुख Baba Aman Singh यांचा एक कथित फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ते केंद्रीय कृषिमंत्री Narendra Singh Tomar यांच्यासोबत दिसत आहे.

नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर सिंघू बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये झालेल्या एका व्यक्तीच्या हत्येनंतर निहंग समूह चर्चेत आहे. दरम्यान, मंगळवारी निहंग समुहाचे प्रमुख बाबा अमन सिंग यांचा एक कथित फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ते केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासोबत दिसत आहे. याबाबत इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सरकारने त्यांना आंदोलनस्थळ सोडून जाण्यासाठी पैशांचे आमिष दाखवल्याचा आरोप बाबा अमन सिंग यांनी केला आहे. तर या फोटोंमुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे, असे विधान पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांनी केले आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार ज्या फोटोमुळे गोंधळ उडाला आहे. त्यामध्ये कृषिमंत्री तोमर, बाबा अमन सिंग, पंजाब पोलिसांचे अधिकारी गुरमित सिंग पिंकी दिसत आहे. पिंकी यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांना हत्येच्या प्रकरणातही दोषी ठरवण्यात आले होते. हा फोटो सुमारे दोन महिन्यांपूर्वीचा आहे. रिपोर्टनुसार सिंघू बॉर्डरवर झालेल्या दलित शीखाच्या हत्येप्रकरणी अमन सिंग याच्या समुहातील सदस्य हा मुख्य आरोपी आहे. दरम्यान, अमन सिंग याने या हत्येचे समर्थन केले होते.

दरम्यान, अमन सिंग याने मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मला शेतकरी आंदोलनाचे आंदोलनस्थळ सोडून जाण्यासाठी १० लाख रुपयांची ऑफर देण्यात आसली होती. माझ्या संघटनेलाही १ लाख रुपये देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र आम्हाला खरेदी करता येणार नाही.

दरम्यान, निहंग सिंघू बॉर्डरवर राहतील की नाही याचा निर्णय २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मात्र कृषी मंत्रालयाकडून याबाबत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना गुरमित सिंग यांनी सांगितले की, मी बाबा अमन यांना ओळखतो आणि ऑगस्ट महिन्यात आम्ही मंत्र्यांच्या घरी गेलो होतो, हे खरे आहे. मात्र या भेटीचा हेतू वेगळा होता. मी काही वैयक्तिक कामामुळे तिथे गेलो होतो. निहंग प्रमुख कृषी कायद्यांवर चर्चा करत होते. मात्र तिथे पैसे देण्याबाबत कुठलाही प्रस्ताव आला नाही. अमन सिंग आणि नरेंद्र सिंग तोमर यांच्यात काय ठरले, हे मला माहिती नाही. पंजाबचे उपमुख्यमंत्री रंधावा यांनी नाव न घेता दावा केला की, हाच निहंग नेता हत्येच्या मुख्य आरोपीचा बचाव करत होता. या समुहाने पीडितावर शीख समुदायाच्या पवित्र ग्रंथाचा अपमान केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, निहंग नेते हे भारत सरकार आणि कृषिमंत्र्यांशी संपर्कात असल्याचे समोर आल्यानंतर आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे, असा दावाही रंधावा यांनी केला आहे.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनNarendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमरCentral Governmentकेंद्र सरकार