शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
4
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
5
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
7
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
8
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
9
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
10
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
11
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
12
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
13
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
14
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
15
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
16
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
17
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास
18
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
19
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
20
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे

"MSP ची हमी, पेन्शन, कर्जमाफी...",  शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरणार, SKM ची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 16:57 IST

या मागण्यांबाबत पंतप्रधान आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांना निवेदन देण्यात येणार असल्याचेही शेतकरी संघटनेने म्हटले आहे.

नवी दिल्ली : विविध मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चाने (SKM) पुन्हा एकदा आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. एमएसपीची कायदेशीर हमी, पेन्शन आणि कर्जमाफीसह प्रलंबित मागण्यांबाबत शेतकरी संघटनेकडून पुन्हा आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच, या मागण्यांबाबत पंतप्रधान आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांना निवेदन देण्यात येणार असल्याचेही शेतकरी संघटनेने म्हटले आहे.

संयुक्त किसान मोर्चाने सर्वसाधारण सभेच्या एका दिवसानंतर ही घोषणा केली. शेतकरी संघटनेने म्हटले आहे की, भारत सरकारच्या कृषी विभागाच्या सचिवांनी स्वाक्षरी केलेल्या ९ डिसेंबर २०२१ च्या कराराची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, शेतकऱ्यांच्या जीवनमानावर परिणाम करणाऱ्या इतर प्रमुख मागण्या मांडण्यात येणार आहेत.

याचबरोबर, सर्व खासदारांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचा एक चार्टर देण्यात येणार असल्याचेही शेतकरी संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच, ९ ऑगस्ट रोजी संयुक्त किसान मोर्चा आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ देशभरात निदर्शने करून 'भारत छोडो दिवस'  हा ​'कॉर्पोरेट भारत छोडो दिवस' ​​म्हणून पाळणार आहे, असेही शेतकरी संघटनेने म्हटले आहे.

"सरकारने आमचे ऐकले नाही"संयुक्त किसान मोर्चाच्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना शेतकरी नेते हन्नान मोल्लाह म्हणाले, "एमएसपी मागण्यांवर पाऊल उचलण्यासाठी काल बैठक बोलाविण्यात आली होती. ३ वर्षे झाली, सरकारने आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही, आम्हाला कोणत्याही बैठकीसाठी बोलावले नाही. एमएसपी आणि कायदेशीर हमी अद्याप दिलेली नाही. आम्ही अभियान सुरु करणार आहोत. मागच्या वेळी दिल्लीला घेराव घालण्यात आला होता, पण यावेळी अखिल भारतीय आंदोलन करू".

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरी