नवी दिल्ली - शेतकरी आंदोलनामुळे राजधानी दिल्लीच्या सीमेवर सध्या वातावरण चांगलेच तापलेले आहे. दिल्लीच्या आसपासच्या राज्यातील शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी सीमेवर नाकेबंदी केली आहे. दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात शाहीनबाग येथे झालेल्या आंदोलनाचा चेहरा बनलेल्या बिल्किस बानो यांनीसुद्धा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच दिल्लीच्या सीमेवर सुरू झालेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्या सिंघू बॉर्डवर पोहोचल्या आहेत.सोमवारी रात्रीसुद्धा सोशल मीडियावर बिल्किस आजींचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये या आजी शेतकऱ्यांच्या कुठल्याही आंदोलनस्थळी दिसत होत्या. तसेच या आजींसोबत असलेले लोक उत्तर प्रदेशहून परतत असताना शेतकऱ्यांची माहिती घेण्यासाठी थांबल्याचे सांगताना दिसत होते. दरम्यान, शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी पोहोचलेल्या बिल्किस बानो यांना पोलिसांनी अटक केली आहे.
शेतकरी आंदोलनात सहभाग घेण्यासाठी सिंघू बॉर्डरवर पोहोचल्या ‘शाहीनबाग’मधील आजी
By बाळकृष्ण परब | Updated: December 1, 2020 16:46 IST