शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

Farmers Protest : १४ डिसेंबरला शेतकरी दिल्लीकडे कूच करणार, शंभू बॉर्डरवरून सर्वनसिंह पंढेर यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 17:23 IST

Farmers Protest : आमच्या आंदोलनाला ३०३ दिवस पूर्ण झाले असून शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला सुद्धा १५ दिवस झाले आहेत, असे शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.  

Farmers Protest : नवी दिल्ली : शंभू बॉर्डरवर ठाण मांडून असलेले शेतकरी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांचा मोर्चा आता १४ डिसेंबरला दिल्लीकडे कूच करणार आहेत. आमच्या आंदोलनाला ३०३ दिवस पूर्ण झाले असून शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला सुद्धा १५ दिवस झाले आहेत, असे शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.  

आम्ही नेहमीच चर्चेचे स्वागत केले आहे. मात्र, सरकारकडून कोणीही आमच्याशी संपर्क साधला नाही. त्यामुळे दोन्ही संघटनांनी १४ डिसेंबरला १०१ शेतकऱ्यांची तुकडी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (बुधवार) शेतकरी आंदोलन यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली जाईल. तसेच, आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांची सुटका करण्याची आमची मागणी आहे, असे सर्वनसिंह पंढेर यांनी सांगितले.

याचबरोबर, सर्वनसिंह पंढेर यांनी पंजाबमधील सर्व गायक आणि प्रसिद्ध व्यक्तींनी पुढे येऊन त्यांच्या मागण्यांसाठी सीमेवर अनेक महिने बसलेल्या शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवण्याचे आवाहन केले.दरम्यान, यापूर्वी, संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या बॅनरखाली १०१ शेतकऱ्यांच्या गटाने ६ आणि ८ डिसेंबर रोजी पायी दिल्लीला जाण्याचे दोनदा प्रयत्न केले होते, परंतु हरयाणाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही. 

८ डिसेंबर रोजी शेतकरी आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्षासारखी परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर शेतकऱ्यांना मागे हटवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यावेळी अनेक शेतकरी जखमीही झाले. त्यानंतर शेतकऱ्यांचा दिल्लीकडे निघणारा मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला होता.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरीdelhiदिल्ली